Headlines

दिव्य भारतीय महाकाव्य ‘श्रीमद् रामायण’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

[ad_1]

Mahakavya Shreemad Ramayan : कोट्यावधी भारतीयांचे दैवत असलेला श्रीराम हा शौर्य आणि सदगुणांचा पुतळा आहे. अशा या भगवान श्रीरामाची कथा सच्चेपणाने आणि विशुद्ध रूपात सादर करण्यासाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर येत आहे मालिका ‘श्रीमद् रामायण’. ही मालिका 1 जानेवारी 2024 पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9.00 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. ही पौराणिक मालिका प्रत्येक भारतीय कुटुंबाला एका प्राचीन काळात घेऊन जाईल, ज्या काळात प्रभावी स्वरूपात अस्तित्त्वात असलेली जीवनमूल्ये आणि शिकवण आजच्या काळात देखील सुसंबद्ध आहे.

या वाहिनीने सदर मालिकेचा एक नवीन प्रोमो दाखल केला आहे, ज्यामध्ये हे उघड झाले आहे की मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारा अभिनेता आहे, सुजय रेऊ.

आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची भूमिका साकारत असलेला सुजय रेऊ या भूमिकेबद्दल म्हणतो, ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत ही भूमिका मिळणे हा मी माझा गौरव मानतो. कोट्यावधी लोकांचे आराध्य दैवत असलेली ही देवता म्हणजे केवळ एक भूमिका नाही. ही एक मोठी जबाबदारी आहे आणि एका आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आहे. प्रभू श्रीरामाची कथा अनेक भारतीयांप्रमाणे माझ्यासाठीही जिव्हाळ्याचा विषय आहे. श्रीराम कथा पडद्यावर जिवंत करणे हे माझ्यासाठी स्वप्न साकार होत असल्यासारखे आहे.”

प्रभू श्रीरामाची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल सुजय रेऊ म्हणतात, ” ही भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली, याचा मला अभिमान आहे. परंतु अशा अत्यंत पूजनीय देवतेची व्यक्तिरेखा साकारणे ही केवळ एक भूमिका नसून ती एक मोठी जबाबदारी आहे. या निमित्ताने मला आध्यात्मिक प्रवासाचा अनुभव घेता येईल. प्रभू रामाच्या कालातीत कथनाला माझ्या हृदयात कायमच विशेष स्थान आहे. श्रीरामाची कथा अनेक भारतीयांप्रमाणे माझ्यासाठीही जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांचा जीवनप्रवास जिवंत करण्याची संधी मला मिळणे, हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे. प्रत्येक कुटुंबाला प्राचीन काळात घेऊन जाणारी ही कथा आहे.” ‘श्रीमद् रामायण’ सुरू होत आहे, 1 जानेवारी 2024 पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *