Headlines

Thalapathy Vijay: जगप्रसिद्ध टाईम्स स्वेअरवर झळकला थलापती विजय, फॅन्सने असं दिलं बर्थडे गिफ्ट; पाहा Video

[ad_1]

Thalapathy Vijay on Times Square: साऊथचा स्टार अभिनेता आणि तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून ओळखला जाणारा थलापती विजय (Thalapathy Vijay) येत्या 22 तारखेला जन्मदिवस (Birthday) साजरा करणार आहे. आपल्या दर्जेदार अभिनयानं त्याने चाहत्यांना वेड लावलं. आपल्या हसमुख चेहऱ्याने त्याने अनेकांचं मनोरंजन केलंय. त्यामुळे त्याच्या फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसतंय. अशातच आता फॅन्सने विजयला बर्थडेनिमित्त खास गिफ्ट दिलं आहे. फॅन्सचं प्रेम पाहून विजय देखील भारावून गेलाय.

लव्ह टुडे, प्रियामुदन, मेरसाल, थुप्पक्की, कठ्ठी, घिल्ली, कधालुक्कू मरियाधाई अशा दर्जेदार सिनेमांनी विजयने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तामिळनाडू राज्य सरकारच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं होतं. त्यामुळे तो प्रतिष्ठित स्थानावर दिसणाऱ्या काही तमिळ अभिनेत्यांपैकी एक बनलाय. अशातच आता विजय जगप्रसिद्ध अशा टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर (Times Square Billboard) झळकल्याचं पहायला मिळतंय.

विजयचे फॅन्स त्याचा वाढदिवस (Thalapathy Vijay Birthday) वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. न्यूयॉर्क सिटीच्या टाईम्स स्क्वेअर बिलबोर्डवर दिसणार्‍या काही स्टार अभिनेत्यांपैकी तो एक स्टार बनला आहे. वाढदिवसापूर्वी बिलबोर्डवर प्ले झालेल्या एका छोट्या व्हिडिओमध्ये अभिनेत्याचे अनेक चित्रे प्रदर्शित करण्यात आली. त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. विजयपूर्वी धनुष आणि आर माधवन सारखे अभिनेते टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर झळकले होते. विजय सध्या लिओ या सिनेमावर काम करत आहे. 19 ऑक्टोबर 2023 रोजी हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे.

टाईम्स स्क्वेअरच्या जाहिरातीसाठी किती खर्च येतो?

न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर एक डिजिटल बोर्ड लावण्यात येतो. तसेच काही व्हिडिओ देखील प्ले केले जातात. येथे एक दिवसाला जाहिरातीसाठी 5 हजार डॉलर ते 50 हजार डॉलरपर्यंत म्हणजेच भारतीय रुपयानुसार 4 लाख ते 41 लाख रुपये इतकं भाडं आकारण्यात येते. व्हिडीओच्या सेकंदानुसार भाडं आकारलं जातं.

आणखी वाचा – Thalapathy Vijay Divorce News : लग्नाच्या 22 वर्षानंतर पत्नीला घटस्फोट देतोय विजय थलपती?  

दरम्यान, काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा व्हिडीओ झळकला होता. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यांनी स्वातंत्र्य, अर्थव्यवस्था, बेरोजगारी, नवीन संसद भवन या विषयांवर भाष्य करत मोदी सरकारवर टीका केली होती. त्यामुळे मोठा वाद देखील झाला होता. भाजपने आक्रमक भूमिका घेत राहुल गांधींना लक्ष्य केलं होतं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *