Headlines

सनी देओलच्या लेकाच्या लग्नात हेमा मालिनी गैरहजर, 42 वर्षांपूर्वीची ती घटना ठरली कारणीभूत?

[ad_1]

Hema Malini Avoid Karan Deol Wedding: गेल्या काही दिवसांपासून करण देवोलचे लग्न चर्चेत होते. सोशल मीडियावर करण आणि द्रिशा आचार्य (Drisha Acharya) यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. 18 जून रोजी करणने द्रिशासोबत लग्नगाठ बांधली. लग्नसोहळ्यासोबतच इतर कार्यक्रमांचे व्हिडिओमुळं त्याचे लग्न गाजले होते. या लग्नात संपूर्ण देवोल कुटुंब एकत्र पाहायला मिळाले. धर्मेंद्र यांनीदेखील करणच्या वरातीत मनसोक्त डान्स केला. तर, बॉबी आणि अभय देओलही काका म्हणून मिरवत होते. मात्र, या सोहळ्यात फक्त एकाच गोष्टीची कमी जाणवली ती म्हणजे धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांची. हेमा मालिनी या लग्नाला का उपस्थित राहिल्या नाहीत याचे कारण समोर आले आहे.

करणच्या लग्नसोहळ्यात सगळ्यांनाच हेमा मालिनी यांच्यासह त्यांच्या दोन मुलींची अनुपस्थिती खटकली होती. हेमा मालिनी या धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. त्यांना दोन मुली आहेत. ईशा आणि अहाना यादेखील या करणच्या लग्नाला अनुपस्थित होत्या. हेमा यांची गैरहजेरी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सनी देओलने हेमा मालिनीसह  ईशा आणि अहानाला निमंत्रण पत्रिका पाठवली होती. मात्र तरीही तिघींनी लग्नाच्या एकाही कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली नाही. 

धर्मेंद्र यांनी 1980 साली हेमा मालिनींसोबत दुसरं लग्न केलं होतं. तेव्हापासून ते आजतागायत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीपासून आणि मुलांपासून लांब राहणंच पसंत केले आहे. प्रकाश कौर आणि हेमा मालिनी याकधीच भेटल्या नाहीयेत. तर, हेमा यांनीही धर्मेंद्र यांच्या पहिल्या परिवाराच्या भावनांचा मान ठेवत त्यांच्यापासून अंतर ठेवलं आहे. गेल्या 42 वर्षांपासून दोघींनीही असेच नाते सांभाळले आहे. 

ईशा- आहानाच्या लग्नातही सनीची अनुपस्थिती

इतकंच नव्हे तर, ईशा आणि आहानाच्या लग्नातही सनी आणि बॉबी देओल हे उपस्थित नव्हते. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांना वाईट वाटू नये म्हणून दोघांनीही लग्नाला जाणे टाळले होते. मात्र, अभिनेता अभय देवोल यांने ईशाच्या लग्नात भाऊ म्हणून सर्व विधी पार पाडल्या होत्या. मात्र चारही भाऊ-बहिणी कधीतरी एकमेकांची भेट घेतात. तसंच, त्यांच्या नात्यात कोणतीही कटुता नसल्याने त्यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे.

हेमा मालिनी यांनीही एका मुलाखतीत आमच्या नात्यात सारे अलबेल असून आम्ही जाणीवपूर्वक एकमेकांसोबत अंतर ठेवतो, असं सांगितले होते. तसंच, ईशाच्या लग्नात सनी आणि बॉबी परदेशात शुटिंग करत होते म्हणून ते लग्नाला येऊ शकले नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *