Headlines

“ते त्यांचं वैयक्तिक मत,” संजय राठोडांच्या मंत्रिपदाला चित्रा वाघ यांच्या विरोधानंतर भाजपाच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया | girish mahajan said chitra wagh have personal opinion of opposing sanjay rathod ministerial post

[ad_1]

एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांच्या संयुक्त सरकराचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील ९ तर भाजपच्या ९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. आजच्या शपथविधी कार्यक्रमात पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप झालेले शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राठोड यांना मंत्रिपद दिल्यामुळे भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. तसेच चव्हाण यांच्या विरोधातील लढा मी सुरुच ठेवणार आहे, असा इशाराही दिला आहे. असे असताना भाजपा नेते गिरीश महाजन यांनी मात्र चित्रा वाघ यांचे ते वैयक्तिक मत आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

हेही वाचा >>> “बदनामी करणाऱ्यांना समोर…” मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सत्तारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

“संजय राठोड यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. चित्रा वाघ यांचे ते वैयक्तिक मत आहे. त्या आधीपासूनच त्यांची बाजू मांडत आहेत. मला वाटतं की चौकशी झाली आहे. काही चौकशी सुरू आहे. या चौकशीतून काही स्पष्टता आलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतलेला आहे,” अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.

हेही वाचा >>> बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीश कुमारांनी भाजपासोबतची युती तोडली

“अब्दुल सत्तार यांच्यावरही आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. या आरोपानंतर कोणाच्याही माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी सत्तार यांनी केली आहे. त्यामुळे चौकशीअंती काही निर्णय आला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कारवाई करतील,” असेदेखील महाजन म्हणाले.

हेही वाचा >>> वर्षभरापूर्वी संजय राठोडांवर देवेंद्र फडणवीसांनी केली होती टीका; म्हणाले होते, “मुख्यमंत्र्यांची केविलवाणी स्थिती…!”

“मंत्रिमंडळ विस्ताराला एक महिना उशीर झाला आहे. काही तांत्रित अडचणींमुळे हा उशीर झाला. जुने, नवे तसेच अनुभवी नेते या सर्वांचा ताळमेळ घालून हा निर्णय घेण्यात आला आहे. अडीच वर्षाच्या काळात काही चुकीचे निर्णय घेण्यात आले. तसेच आमच्या काही चांगल्या निर्णयांना स्थगिती देण्यात आली. अडीच वर्षाच्या बॅकलॉकमुळे आम्हाला दुप्पट ते तिप्पट गतीने काम करावे लागणार आहे. केंद्रात तसेच राज्यात आमचे सरकार आहे. त्यामुळे निधी, केंद्रातील अडचणी तसचे इतर गोष्टींना बाजूला करून आम्हाला काम करायचे आहे,” अशी ग्वाहीदेखील गिरीश महाजन यांनी दिली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *