Headlines

…तरच तुमचं लग्न शेवटपर्यंत टिकतं; लग्नाच्या 19 वर्षांनंतर ‘या’ लोकप्रिय Actress नं घेतला Divorce

[ad_1]

Shubhangi Atre got divorced : छोट्या पडद्यावरील ‘भाबी जी घर पर है’ (Bhabi Ji Ghar Par Hai) ही मालिका लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर अप्रतिम अभिनय करत राज्य केलं. या मालिकेत अंगुरी भाभी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रेनं (Shubhangi Atre) 19 वर्षे संसार केल्यानंतर घटस्फोट घेतला आहे. गेल्या एका वर्षापूर्वी शुभांगी आणि पीयूष पूरीनं विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. 2003 साली इंदौरमध्ये शुभांगी आणि पीयूषनं सप्तपदी घेतल्या होत्या. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शुभांगीनं तिचं आणि पती पीयूष पूरीचा (Piyush Poorey) संसार कसा मोडला यावर वक्तव्य केलं आहे. 

शुभांगीनं ‘ईटाइम्स’ला नुकतीच मुलाखत दिली होती. यावेळी शुभांगीनं विभक्त झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. मी आणि पीयूष गेल्या वर्ष भरापासून एकत्र राहत नाही आहोत. पीयूष आणि मी शेवटपर्यंत आमचं लग्न वाचवण्याचा प्रयत्न केला. तर लग्न म्हणजे एकमेकांचा सन्मान करणे, विश्वास ठेवणे आणि त्यासोबत मैत्री असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी असतील तरच तुमचं लग्न शेवटपर्यंत जसं आहे तसं राहू शकतं,’ असं शुभांगी म्हणाली.

पुढे तिच्या वैवाहिक आयुष्यात असलेल्या अडचणींवर शुभांगी म्हणाली, आम्हाला दोघांना एक गोष्ट कळलं होती आणि ती म्हणजे आमच्यात होणारे मतभेद. आमची मत जुळत नव्हती. त्यामुळे आम्ही एकमेकांना आयुष्यात थोडी स्पेस देत खासगी आयुष्यात आणि करिअवर लक्ष केद्रिंत करण्याचा निर्णय घेतला. पण हे सगळ्यात वाईट आहे, कारण माझं कुटुंबच माझी पहिली प्रायॉरिटी होती आणि आता आम्हाला सगळ्यांना आमचे कुटुंब जवळपास असले पाहिजे अशी अपेक्षा आहे. पण ज्या काही चुका झाल्या आहेत, त्यात कोणत्याही प्रकारचे बदल होऊ शकत नाही.

पुढे विभक्त झाल्यानंतर त्याचा कसा परिणाम झाला, या विषयी शुभांगी म्हणाली, जेव्हा आपण बरीच वर्षे एका नात्यात असतो आणि एक दिवस अचानक ते नातं तुटतं किंवा संपत तेव्हा त्याचा आपल्यावर खूप वाईट परिणाम होतो. माझ्यावर देखील याचा परिणाम झाला होता. पण आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. मानसिक शांती ही कधीही आपल्या आयुष्यात महत्त्वाची असते. शुभांगी आणि पीयुष हे दोघं मिळून त्यांच्या 18 वर्षांच्या मुलीची को पेरेंटिंग करणार आहेत. तर सध्या त्यांची लेक ही शुभांगीसोबत आहे. 

हेही वाचा : Satish Kaushik यांना पाहताच अर्चना पुरण सिंग म्हणाल्या होत्या, ‘ये तो मेरा पुराना दीवाना…’

पुढे शुभांगी म्हणाली की, त्यांची लेक आशीला आई-वडील दोघांच्या प्रेमाची गरज आहे. पीयूष रविवारी तिला भेटायला येतात. माझी अशी मुळीच इच्छा नाही की तिला तिच्या वडिलांचे प्रेम मिळत नाही. दरम्यान, 2006 साली प्रदर्शित झालेल्या ‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेतून शुभांगीनं तिच्या करिअरची सुरुवात केली होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *