Headlines

T20 World Cup मधील पराभवानंतर मोठा फेरबदल! टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी VVS Laxman

[ad_1]

मुंबई : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाचा (Team India) दारूण पराभव झाला. इंग्लंडने 4 ओव्हर्स आणि 10 विकेट राखून टीम इंडियावर मोठा विजय मिळवला. या पराभवानंतर टीम इंडियाचा वर्ल्ड कपच स्वप्न भंगलय. टीम इंडियाच्या पराभवानंतर अनेक खेळाडूंच्या निवृत्तीच्याही चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यात आता टीम इंडियात मोठा फेरबदल पाहायला मिळणार आहे. 

न्यूझीलंड दौरा

टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) आता टीम इंडिया (Team India) न्यूझीलंडचा (New Zealand) दौरा करणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 सामने आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. पहिला T20 सामना 18 नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे या दौऱ्याची क्रिकेट फॅन्सला उत्सुकता लागली आहे. 

व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक

न्यूझीलंड (New Zealand Tour)  दौऱ्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण (vvs Laxman) यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. तर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना या दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे आता न्यूझीलंड दौऱ्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावणार आहे. 

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, “लक्ष्मणच्या (vvs Laxman) नेतृत्वाखालील एनसीए संघ हृषिकेश कानिटकर (फलंदाजी) आणि साईराज बहुले (गोलंदाजी) यांच्यासह न्यूझीलंडला जाणाऱ्या संघात सामील होईल. दरम्यान याआधी देखील लक्ष्मणने भारतीय संघाची धुरा सांभाळली आहे. झिम्बाब्वे आणि आयर्लंडच्या दौऱ्यांदरम्यान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान लक्ष्मणने भारताचे प्रशिक्षकपद भूषवले होते.

‘या’ खेळाडूंना देणार विश्रांती

राहूल द्रविडसह (Rahul Dravid) कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन या सिनियर खेळाडूंना या दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. तर संपूर्ण प्रशिक्षक कर्मचाऱ्यांनाही टी-20 वर्ल्ड कपनंतर विश्रांती देण्यात आली आहे. 

दरम्यान न्युझीलंड दौऱ्यासाठी (New Zealand Tour) टीम इंडियाचे कर्णधारपद T20 साठी हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya)  सोपवण्यात आले आहे, तर शिखर धवन वनडेसाठी कर्णधारपद भूषवणार आहे. विकेटकिपर ऋषभ पंतला दोन्ही फॉरमॅटमध्ये उपकर्णधार बनवण्यात आले आहे. या मालिकेला 18 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. आता क्रिकेट फॅन्सना या दौऱ्याची उत्सुकता लागली आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *