Headlines

सुश्मिता सेन-ललित मोदींच्या ‘अफेअर’ची गोष्ट, जाणून घ्या संपूर्ण Love Story

[ad_1]

मुंबई : सुश्मिता सेन…१९९४ मध्ये भारताला सर्वात पहिल्यांदा मिस युनिव्हर्सचा मुकुट जिंकून देणारी विश्वसुंदरी… पण ही मिस युनिव्हर्स लवकरच मिसेस मोदी होणार असल्याची चर्चा आहे… आयपीएलचे माजी प्रमुख आणि सध्या लंडनला पळून गेलेले उद्योगपती ललित मोदी यांच्याशी सुश्मिताचं सूत जुळलंय. ललित मोदींनीच ट्विट करून त्यांच्या प्रेमसंबंधांची कबुली दिली. सुश्मितासोबत मालदीवच्या सर्डिनियामध्ये एन्जॉय केलेल्या ट्रिपचे फोटोही त्यांनी शेअर केले…त्या ट्विटमध्ये सुश्मिताचा उल्लेख त्यांनी बेटर हाफ म्हणजे अर्धांगिनी असा केला.. पुढच्याच ट्विटमध्ये अजून आमचं लग्न झालेलं नाही… पण लवकरच होईल, असा दावाही त्यांनी केला. त्यामुळं सुश्मिताच्या चाहत्यांचा एकच धक्का बसला.. सुश्मिता आणि ललित मोदींच्या एका फोटोमध्ये तिनं हातात अंगठी घातल्याचं दिसत होतं… त्यामुळं साठीच्या उंबरठ्यावर असलेले मोदी आणि पन्नाशीच्या वेशीवर असलेली सुश्मिता यांनी चोरी चोरी चुपके चुपके साखरपुडा केल्याची चर्चा सुरू झाली…

सुश्मिता सेनचं हे काही पहिलं अफेअर नाही… याआधी विक्रम भट्ट, वसीम अक्रम, रणदीप हुडा, ऋतिक भसीन, मुद्दसर अजीज, बंटी सचदेव, संजय नारंग आणि रोहमन शॉल अशा अनेकांसोबत तिचं नाव जोडलं गेलं… पण तिचं ललित मोदींसोबत सुरू झालेलं चक्कर अनेकांना चक्रावून टाकणारं होतं… २०१३ पासूनच ललित मोदीसोबत तिच्या प्रेमाचा सिलसिला सुरू असल्याचं सांगितलं जातंय..

दरम्यान, ललित मोदींच्या ट्विटनंतर तब्बल २४ तासांनी सुश्मिता सेननं आपल्या नात्याबाबत स्पष्टीकरण दिलं… अलिसा आणि रेनी या दोन दत्तक मुलींसोबतचा फोटोही तिनं शेअर केला.

मी सध्या खुप आनंदी आहे. लग्न केलेलं नाही. साखरपुडा देखील केलेला नाही. बिनशर्त प्रेम करणा-या व्यक्तींच्या सहवासात आहे. पुरेसं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता तुम्ही तुमचं आयुष्य जगा आणि कामाला लागा ! माझा आनंद शेअर केल्याबद्दल धन्यवाद… आणि ज्यांनी तो शेअर केला नाही, त्यांच्यासाठी नेहमीप्रमाणंच ‘None of Your Business”, असं कॅप्शन सुश्मितानं पोस्टला दिलंय…

अभिनेत्री म्हणून सुश्मिताचं करिअर फारसं गाजलं नाही… पण खासगी आयुष्यामुळं ती कायमच लाइमलाईटमध्ये राहिली… आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर पोहोचलेली ही सुंदरा लग्नाच्या बेडीत खरंच अडकणार का? हे आता येणाऱ्या काळातच कळणार आहे.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *