Headlines

Suryakumar Yadav ला MOM मिळायला…; अवॉर्ड मिळाल्यानंतर असं का म्हणाला के.एल राहुल?

[ad_1]

गुवाहाटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील रोमहर्षक 3 सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसरा सामना 2 ऑक्टोबर रोजी गुवाहाटीतील बुर्सपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये भारताने 16 रन्सची सामना जिंकण्याबरोबरच सिरीजही जिंकली. भारताच्या या विजयाचा पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव हिरो ठरलाय. दरम्यान सामन्यानंतर के.एल राहुलने मोठं विधान केलं आहे.

टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयात टीमचा उपकर्णधार केएल राहुलने देखील महत्त्वाची भूमिका बजावली. टीमला जबरदस्त सुरुवात देण्यासोबतच त्याने अप्रतिम अर्धशतकही झळकावलं. यासाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कारही मिळाला आहे. यानंतर केएल यांने हा अवॉर्ड सूर्यकुमारला मिळायला हवा होता, असं म्हटलंय.

के.एल राहुल म्हणाला, “मला आश्चर्य वाटतं की मला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. तो सुर्याला मिळायला हवा होता. खरं तर त्याने खेळ बदलला. सूर्या आणि विराटनेही पहिल्या बॉलवर बॅकफूट पंच मारून मला सेट केलं. जेव्हा मी विकेटच्या दोन्ही बाजूंनी खेळतो तेव्हा मला कळतं की, माझ्याकडे चांगलं संतुलन आहे.”

“एक सलामीवीर म्हणून हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की, सामन्यात काय आवश्यक असतं. खरं सांगायचं तर, पहिल्या दोन ओव्हरनंतर माझ्या आणि रोहितमध्ये बोलणं झालं. त्यावेळी आम्हाला वाटलं 180-185 हे चांगलं लक्ष्य असेल,” असंही राहुलने सांगितलं.

सूर्यकुमारची तुफान खेळी

फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक खेळी खेळली. मैदानावर येताच त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. या सामन्यात सूर्यकुमारने अवघ्या 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 22 बॉलमध्ये 61 रनची तुफानी खेळी केली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *