Headlines

Surya Grahan 2022 : सूर्यग्रहणामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, कसा ते जाणून घ्या

[ad_1]

Precautions For Pregnant Women : आज संध्याकाळी सूर्यग्रहण लागणार आहे पण त्यापूर्वी पहाटचे सूतक काळ सुरु झाला आहे. खगोलशास्त्रानुसार सूर्यग्रहण म्हणजे चंद्र सूर्याच्या किरणांना पृथ्वीच्या दिशेने येण्यापासून रोखतं त्या घटनेला सूर्यग्रहण असं म्हटलं जातं. साध्या शब्दांत सांगायचं झालं तर जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये प्रवास करतो तेव्हा सूर्यग्रहण होतं. ही घटना सामान्यतः अमावस्या दरम्यान घडते. पण धार्मिक मान्यतांनुसार सूर्यग्रहण हे अशुभ मानलं जातं. त्यामुळे ग्रहण काळात लहान मुलं आणि गर्भवतींनी विशेष काळजी घ्यावी असं म्हटलं जातं. त्याशिवाय आरोग्यावरही सूर्यग्रहणाचा परिणाम होतो. असं मानलं जातं की सूर्यग्रहणाच्या वेळी आरोग्यामध्ये पाच प्रकारचे बदल दिसून येतात. (solar eclipse 2022 pregnant women and Children Take Care Of These Things nmp )

आरोग्यावर असं दिसतात परिणाम

आळस आणि थकवा (Laziness and Fatigue)

अध्यात्मिकनुसार तुम्हाला सूर्यग्रहणदरम्यान थकवा आणि आजारपण अनुभवू शकता. ग्रहण काळात महत्त्वाचं निर्णय घेणं टाळा.

गर्भवती महिलांवर परिणाम (Impact on Pregnant Women)

असं मानलं जातं की गर्भातील गर्भ आजार किंवा मानसिक समस्यांनी ग्रस्त होऊ शकतो. त्यामुळे ग्रहणकाळात गर्भवती महिलांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला दिला जातो.

डोळ्यांशी संबंधित समस्या (Eye-related Problems)

सूर्यप्रकाश अतिशय तेजस्वी असतो आणि उघड्या डोळ्यांना हानी पोहोचवू शकतो. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहताना, सूर्यकिरणांमुळे तुमच्या रेटिनाला हानी पोहोचते आणि तुम्हाला अंधत्व येऊ शकते. त्यामुळे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहण्यास मनाई आहे.

पचनसंबंधित समस्या (Digestion-related Problems)

इतर समजुतींप्रमाणेच, सूर्यग्रहणामुळेही पचनसंबंधित समस्या उद्भवू शकतात. याच कारणामुळे सूर्यग्रहण काळात खाण्यास मनाई आहे.

मानसशास्त्रीय समस्या (Psychological Issues)

 सूर्यग्रहणाचा माणसावर मानसिक परिणाम होऊ शकतो असे अनेक तज्ञांचं मत आहे. त्यांना भयानक स्वप्न पडू शकतात, चिंता वाटू शकते आणि त्यांच्या नातेसंबंधात चढ-उतार होऊ शकतात. ग्रहणाच्या काळात झोपू नये असा सल्ला दिला जातो.

गर्भवती महिलांनी या गोष्टींची काळजी घ्यावी (Pregnant Women Should Take Care Of These Things)

पौराणिक मान्यतेनुसार, सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांना विशेषत: असुरक्षित वाटतं. सूर्यग्रहण दरम्यान नकारात्मक ऊर्जा खूप असल्याने आई आणि मुलावर याचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, सूर्यग्रहणाच्या काळात मातांना अतिरिक्त सावधगिरी बाळगण्यास सांगितलं जातं.

सूर्यग्रहण काळात महिलांना घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. असं मानलं जातं की ग्रहणाचा प्रभाव गर्भ आणि आईवर दिसून येतो.

गर्भवती महिलांनी सूर्यग्रहण पाहणे टाळा.

ग्रहण काळात आंघोळ करणे टाळावे. ग्रहणाच्या आधी आणि नंतर आंघोळ करावी.

गर्भवती महिलांनी चाकू किंवा सुया यांसारख्या धारदार वस्तूंचा वापर करू नये.

दागिने आणि धातूपासून बनवलेल्या वस्तू जसे की सेफ्टी पिन, हेअर पिन इत्यादी घालणे टाळा.

ग्रहण काळात झोपणे अशुभ मानलं जातं.

सूर्याची किरणे तुमच्या खोलीत येऊ देऊ नका. कोणत्याही प्रकारे सूर्याच्या संपर्कात येऊ नका.

ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार, सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी त्यांच्या पलंगावर दुर्वा ठेवावे.

 

सूर्यग्रहण काळात मुलांनी ‘या’ गोष्टी करू नयेत (Children Should Not Do These Things) 

 

सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नका. जर तुम्हाला ग्रहण पहायचे असेल तर UV फिल्टर चष्मा किंवा टेलिस्कोप वापरा.

ग्रहणकाळात दात घासणे, केस कापणे किंवा घासणे आणि नखे कापणे टाळा.

ग्रहणाच्या काळात अन्न खाणे टाळा कारण या तासांमध्ये पचनसंस्था कमजोर असते असं मानलं जातं.

सूर्यग्रहणाचा निसर्गावर होणारा परिणाम (Solar Eclipse Impact On The Nature)

सूर्यग्रहणाच्या वेळी तयार होणाऱ्या सावल्या या सामान्य सावल्यांपेक्षा वेगळ्या असतात.

सूर्यग्रहणाच्या वेळी वातावरणात वारा वाहत नाही.

ग्रहणाच्या काळात पक्षीही शांत असतात.

तापमान 10-15° फॅरेनहाइटच्या आसपास घसरतं.

प्राणी हरवलेले आणि घाबरलेले दिसतात तर काही झोपतात.

सूर्यग्रहणानंतर सुमारे एक तासानंतर वातावरणात संपूर्ण तेज आणि प्रकाश असतो.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *