Headlines

Surya Grahan 2022 : ‘या’ राशींना त्रास, तर ‘या’ राशींना होणार महालाभ

[ad_1]

Solar Eclipse 2022 Effects Horoscope : आज या वर्षातील शेवटचा सूर्यग्रहण आहे. आजचं सूर्यग्रहण हे भारतात दिसणार असल्यामुळे या ग्रहणाला धार्मिक महत्त्व आहे. कार्तिक अमावस्या म्हणजेच सूर्यग्रहणाचा योग आहे. त्यामुळे या सूर्यग्रहणाचा काही राशींना त्रास तर काही राशींसाठी महालाभ घेऊन येणार आहे. मग कुठल्याकुठल्या राशींवर या ग्रहणाचा काय परिणाम होणार ते आज आपण जाणून घेणार आहोत. जाणून घ्या तुमची राशीसाठी हे सूर्यग्रहण शुभ आहे की अशुभ.

तूळ राशीत सूर्यग्रहण होणार असून या दिवशी देशभरात गोवर्धन पूजाही केली जाणार आहे. सूर्यग्रहणादरम्यान तूळ राशीमध्ये चार ग्रहांचा संयोग होणार असून, सूर्याबरोबरच केतू, शुक्र आणि चंद्रही तूळ राशीमध्ये बसतील. जरी सूर्यग्रहणाची घटना शुभ मानली जात नसली तरी काही राशींसाठी हे सूर्यग्रहण आनंददायी आणि लाभदायक ठरू शकते. (solar eclipse 2022 effects zodiac good and bad nmp)

कुठल्या राशींसाठी लाभदायक

सिंह (Leo)

सूर्यग्रहणामुळे सिंह राशींच्या लोकांचा आत्मविश्वास थोडा कमकुवत होऊ शकतो. पण ग्रहांच्या स्थितीमुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरदार लोकांच्या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात लहान भावंडांच्या माध्यमातून लाभ होऊ शकतो.

धनु (Sagittarius) 

धनु राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण खूप शुभ आहे.  या राशींच्या लोकांना अनेक स्त्रोतांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन लोकांशी मैत्री करू शकता. तुमची प्रतिकारशक्ती देखील सुधारेल, दीर्घ आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना यावेळी आराम मिळू शकतो. ज्यांनी पूर्वी गुंतवणूक केली होती त्यांनाही आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

मीन (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण संमिश्र राहील. या काळात तुम्हाला लाभ मिळू शकतो, परंतु तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून सावध राहावं लागेल. जर तुम्ही संयम ठेवला तर तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग खुले होऊ शकतात.

या राशींनी सावधान!

वृषभ (Taurus)

ज्योतिष शास्त्रानुसार हे सूर्यग्रहण वृषभ राशीच्या लोकांना समस्या देऊ शकते. या राशीच्या लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांनी प्रवासात काळजी घ्यावी. नोकरी किंवा व्यवसायात काही बदल होऊ शकतात. हा बदल तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही. तुमचं आर्थिक नुकसानही होऊ शकते.

कन्या (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठीही हे सूर्यग्रहण शुभ नाही. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे, त्यांनी या काळात महत्त्वाचे निर्णय न घेतल्यास बरे. या दरम्यान तुमचा खर्च वाढेल.

तूळ (Libra)

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य तूळ राशीत राहील. अशा स्थितीत ग्रहणाचा सर्वाधिक प्रभाव तूळ राशीच्या लोकांवर राहील. या काळात त्यांचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. हृदयरोग्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

वृश्चिक (Scorpio)

हे सूर्यग्रहण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी देखील योग्य नाही. तुमचे उत्पन्न कमी होऊ शकते. धनहानी होऊ शकते.  कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *