Headlines

ज्या चित्रपटानं Famous केलं त्याच Hera Pheri विषयी सुनील शेट्टी ‘असं’ का म्हणाला?

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar), सुनिल शेट्टी (Suniel Shetty) आणि परेश रावल (Paresh Rawal) अभिनेत्यांचा ‘हेरा फेरी’ (Hera Pheri) या चित्रपटाच्या 3 (Hera Pheri 3) भागाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. अलीकडेच अक्षय कुमारनं सांगितलं होतं की तो ‘हेरा फेरी 3’ मध्ये नसेल. तर अक्षयची जागा कार्तिक आर्यननं घेतली असे देखील म्हटले जात होते. यानंतर सोशल मीडियावर अक्षयचं चित्रपटात पाहिजे असे म्हणू लागले. अशा परिस्थितीत एमएक्स प्लेयरच्या ‘धारावी बँक’ या वेबसिरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या सुनील शेट्टीनं यावर पुन्हा एकदा भाष्य केले आहे.

पाहा काय म्हणाला सुनील शेट्टी 

धारावी बँकेच्या एका कार्यक्रमात ‘हेरा फेरी’च्या प्रश्नावर सुनील शेट्टी म्हणाला,’मी धारावीत इतका व्यस्त आहे की हेरा फेरी झाली की नाही, हेराफेरीमध्ये, मलाही कळत नाही. तर ही हेरा फेरी जाणून घेण्यासाठी मला पुन्हा हेरा फेरीच्या निर्मात्याकडे जावे लागेल, अक्षय आणि तुमच्यामध्ये हेरा फेरी झाली आहे का ते विचारावं लागेल. मला खरोखर माहित नाही, मी 20 वी तारखेनंतर जाईन, त्यांच्यासोबत बसेन, समजून घेईन आणि काय झालं आहे ते जाणून घेईन. हेरा फेरी नको व्हायला पण हेरा फेरी नक्कीच बनेल.’

हिंदुस्तान टाइम्सच्या कार्यक्रमात अक्षय म्हणाला होता, ‘हेरा फेरी माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. इतकी वर्षे चित्रपट बनला नाही याचेही मला वाईट वाटते. पण मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला चौकटीबाहेरचा विचार करावा लागेल. बघा, चित्रपटासाठी आलेल्या स्क्रिप्टवर मी खूश नव्हतो, म्हणून मी माघार घेतली. मी ते करू शकत नाही याचे मला खूप वाईट वाटते, परंतु क्रिएटिव्हिटी नाही, म्हणूनच मी सोडले. मी सोशल मीडियावर लोकांना ना राजू, ना हेरा फेरी असे म्हणताना पाहिले. मलाही त्याच्यासारखेच वाईट वाटले. माझे चाहते माझ्यावर खूप प्रेम करतात. पण मी हेरा फेरी 3 करत नसल्याबद्दल त्यांची माफी मागतो. मला क्षमा करा.’

हेही वाचा : लेकिनं हिंदू जोडीदार निवडला म्हणून Aamir Khan कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर

एकीकडे अक्षय चित्रपटाबाबत क्रिएटिव्ह डिफरन्ससारख्या गोष्टी सांगत आहे, तर दुसरीकडे त्याच्या मानधना  बाबत काहीही म्हटले जात नाही. खरं तर, बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, निर्माता फिरोज नाडियाडवाला ‘हेरा फेरी 3’ या चित्रपटासाठी अक्षय कुमारशी चर्चा करत होते, परंतु त्यांनी या चित्रपटासाठी 90 कोटी रुपये फीची मागणी केली होती. यासोबतच प्रॉफिटचा वाटाही मागितला. त्याचवेळी फिरोज यांच्या डोक्यात कार्तिक आर्यन हा पर्याय देखील होता आणि जेव्हा त्याच्याशी बोलले केले तेव्हा कार्तिक आर्यन हा चित्रपट फक्त 30 कोटींमध्ये करायला तयार होता. अशा स्थितीत निर्मात्यांना थेट फायदा होतो.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *