Headlines

Sukesh सोबतच्या जवळिकतेवर सलमान आणि अक्षय जॅकलिनला काय म्हणाले होते?

[ad_1]

Jackilne Fernandes and Salman Khan: बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस 200 कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणात अडकली आहे, या प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबतच्या (Sukesh Chandrashekhar Money Laundering Case) आणि तिच्या संबंधांमुळे चर्चेत आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे. 

सध्या हे प्रकरण जोरात सुरू असल्यानं या प्रकरणाशी संबंधित अनेक गुपितं समोर येत असून जॅकलिन बद्दलचं अनेक सिक्रेट्ससमोर येत आहेत. अशीही बातमी समोर आली आहे की जॅकलिनला सुकेश चंद्रशेखरसोबत लग्न करायचे होते. पण त्याचसोबत अजून अशीच एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. ती म्हणजे सलमान खान आणि अक्षय कुमार (Akshay Kumar and Salman Khan) यांनी जॅकलिनला सुकेशबद्दल सावध केलं होतं.

परंतु जॅकलिनं ते ऐकलं नाही. समोर आलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान जॅकलिन फर्नांडिसने कबूल केले की सुकेशच्या जीवनशैलीचा तिच्यावर खूप प्रभाव होता. 

जॅकलिनच्या कोस्टारनं तिला सुकेशशी काळजी घेण्यास सांगितले होते. परंतु जॅकलिन मात्र सुकेशला भेटत राहिली आणि त्याच्याकडून महागड्या भेटवस्तू घेत राहिली. अभिनेत्रीने पोलिसांना सांगितले की, तिला सुकेशच्या लग्नाबद्दल काहीही माहिती नाही, तिला एवढेच सांगण्यात आले की सुकेश लीना मारिया पॉलसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे.

सुकेशने जॅकलीनला प्रभावित करण्यासाठी त्याच्या व्यवस्थापकाला डुकाटी बाइकही भेट दिली होती. जो दिल्लीत जप्त करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीप्रमाणे जॅकलिन फर्नांडिस, तिचे कुटुंबीय आणि मित्रांना सुकेशच्या गुन्हेगारी भूतकाळाबद्दल माहिती होती. मात्र या सर्वांना सुकेशकडून आर्थिक फायदा होत असल्याने त्यांनी सुकेशच्या गुन्हेगारी भूतकाळाकडे दुर्लक्ष केले.

सुकेशने जॅकलीनला मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर 57 लाखांचा घोडा भेट दिला होता आणि तो घोडा रेसकोर्समध्ये ठेवण्यासाठी 7 लाख रुपये दिले. सुकेशने अमेरिकेत बीएमडब्ल्यू कार घेण्यासाठी जॅकलिनच्या बहिणीला एक लाख 80 हजार डॉलर्स पाठवले. जॅकलिनच्या आई-वडिलांसाठी बहरीनमध्ये दोन कार खरेदी करण्यासाठी एक कोटी 89 लाख रुपये पाठवले. ऑस्ट्रेलियात जॅकलिनच्या भावासाठी एसयूव्ही खरेदी करण्यासाठी 50 हजार अमेरिकन डॉलर्स पाठवले. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *