Headlines

Sudhir Mungantiwar support nitesh rane on statement regarding devendra fadnavis as hinduhrudaysarat spb 94

[ad_1]

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘हिंदुहृदयसम्राट’ असल्याचा उल्लेख नितेश राणे यांनी केला होता. राणेंच्या या वक्तव्याचं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी समर्थन केले आहे. हिंदू हिताची भाषा करणारा प्रत्येक जण ‘हिंदुहृदयसम्राट’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – “…तर उदय सामंतांना जाळून टाकू” नाना पटोलेंसमोर भाषण करताना रिफायनरी विरोधकाचं खळबळजनक विधान

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

”देवेंद्र फडणवीस असेल, किंवा राज ठाकरे असेल किंवा तुमच्यापैकी कोणी असेल, जो कोणी व्यक्ती हिंदू हिताची भाषा करेल, हिंदूंवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडेल, तो प्रत्येक व्यक्ती हिंदुहृदयसम्राटआहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी हिदुत्त्वाचा भगवा हातात घेऊन ज्या प्रकारे भयमुक्तीचं वातावरण देण्याचा प्रयत्न केला. ते आता आणखी कोणी करत असेल, तर त्यात गैर काहीही नाही, अशी मुनगंटीवार यांनी दिली आहे.

हेही वाचा – अजित पवारांच्या नाराजीनाट्याची चर्चा: NCP च्या राष्ट्रीय अधिवेशनात भाषण का केलं नाही? विचारलं असता म्हणाले, “मी भाषण…”

नितेश राणे नेमकं काय म्हणाले होते?

श्रीरामपूर येथील बेपत्ता तरुणासंदर्भात भाजपा आमदार नितेश राणे यांनी श्रीरामपूर पोलीस आयुक्त कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होते. त्यावेळी बोलताना नितेश राणेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिंदुहृदयसम्राट, असा उल्लेख केला होता. “महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक नाही आहेत. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ नाहीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाही आहेत, हे संबंधितांनी लक्षात ठेवावं. महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडवट हिंदू आहेत. तर, उपमुख्यमंत्री म्हणून हिंदुहृदयसम्राट देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं,” असा इशारा पोलीस अधिकाऱ्यांना नितेश राणेंनी दिला होता.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *