Headlines

“शाहरुख माझे पाय चाटतो”; धक्कादायक वक्तव्यानंतर आर्यन-सुहानाला भेटायला पोहोचला आमिर खान

[ad_1]

शाहरुख (shahrukh khan), सलमान (salman khan) आणि आमिर (aamir khan) हे बॉलीवूडचे (bollywood) खान म्हणून ओळखले जातात. एक काळ असा होता जेव्हा तिघांमध्येही घट्ट मैत्री होती. यानंतर एक वेळ अशी आली की त्यांच्यातील मतभेद हे हेडलाइन्स बनू लागल्या. सलमान आणि शाहरुखमध्ये बरेच दिवस शीतयुद्ध (Coldwar) सुरू होते. आमिरनेही (aamir khan) एकदा असे काही लिहिले होते, ज्यानंतर या दोघांमध्ये शत्रुत्व आले होते. आमिरने शाहरुख (shahrukh khan) माझे पाय चाटतो असे म्हटले होते.

बॉलीवूडमधील इतर वाद एका बाजूला आणि या तिनही खानमधील वाद एका बाजूला. अनेकदा यांच्यामधील शत्रुत्वावरून चर्चाही होत असतात. शाहरुख आणि आमिरमधील मतभेदाचे प्रकरणही खूप चर्चेत आहे. फार पूर्वी आमिर खान ब्लॉग लिहायचा. एकदा त्याने ब्लॉगमध्ये, शाहरुख माझे पाय चाटतो आणि मी त्याला सारखं सारखं बिस्किटे खायला घालतो. मला अजून काय हवे आहे?, असे लिहिले होते.

यानंतर त्याने या ब्लॉगमध्ये शाहरुख हे त्याच्या पाळीव कुत्र्याचे नाव असल्याचे स्पष्ट केले. तुम्ही कोणत्याही निष्कर्षावर जाण्यापूर्वी, शाहरुख हे आमच्या कुत्र्याचे नाव आहे, असे म्हटले होते. ही घटना आमिर खानच्या गजनी चित्रपटाच्या दरम्यान घडली होती.

शाहरुखनेही दिली प्रतिक्रिया

रजत शर्मांच्या आपकी अदालत शोमध्ये शाहरुख खानला याबाबत विचारण्यात आले होते. यावर शाहरुखने उत्तर दिले की, “मला ते इतके मजेदार वाटले नाही. हे ऐकून मला कुत्रा असल्या सारखं वाटत होतं. वाटलं, असं बोलत असेल तर एकदा चावतोच. मला गांभीर्याने सांगायचे आहे की, त्याचे म्हणजे टीव्हीवर ज्या पद्धतीने आले तसे तो म्हणाला नाही. आमिरने पाचगणीमध्ये नवीन घर घेतले होते. त्याचा केअरटेकर माझा चाहता होता आणि त्याने त्याच्या कुत्र्याचे नाव शाहरुख ठेवले होते. आमिरने घर घेतले तेव्हा त्याला कुत्रा मिळाला. आमिर माझ्या घरी आला, तो म्हणाला, हा विनोद असो किंवा काही असा मला वाटतं तुमच्या मुलांना ही गोष्ट आवडली नसणार. त्यामुळे मला आर्यन आणि सुहानाला सांगायला आवडेल की मला तुमच्या वडिलांबद्दल खूप आदर आहे. मला ते म्हणायचे नव्हते, पण ते झाले. ती गोष्ट तिथेच सोडवली गेली”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *