Headlines

‘तो काय बोलतोय ठाऊक नाही’; BCCI की विराट, नेमकं खरं कोण?

[ad_1]

Virat Kohli vs BCCI: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), सध्या एशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) खेळत आहे. सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये विराटनं दमदार खेळ दाखवत आपण पुन्हा एकदा जुन्या फॉर्ममध्ये आल्याचा जणू इशारातच दिला. पण, खेळीपेक्षा त्याच्या वक्तव्याची सर्वाधिक चर्चा सध्या पाहायला मिळत आहे. 

नुकत्याच झालेल्या (IND Vs PAK) पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराटनं 60 धावांची खेळी केली. ज्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना तो काहीसा भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. कसोटी क्रिकेटचं (Test Captain) कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला, तेव्हा आपल्याला फक्त महेंद्रसिंह धोनीचाच (MS Dhoni) मेसेज आला होता. त्याच्याशिवाय इतर कोणीही फोन किंवा मेसेज न केल्याची खंत त्यानं बोलून दाखवली. 

विराटच्या या वक्तव्यानंतर क्रिकेट जगतातून बऱ्याच प्रतिक्रिया उमटू लागल्या. बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानंही आपण विराटला पूर्ण पाठिंबा दिल्याचं स्पष्ट केलं. (Asia Cup 2022 Virat Kohli vs BCCI clash)

त्याला गरज होती तेव्हा विश्रांती घेऊ दिली… 
BCCI अधिकाऱ्यानं विराटला आपल्याकडून पाठिंबा मिळाल्याची बाब स्पष्ट केली. इतकंच नव्हे, तर सोबतच्या खेळाडूंनीही त्याला साथ दिली होती. आता तो म्हणतोय की कोणाचीच सोबत नव्हती हे पूर्णपणे चुकीचं आहे, असं नाव न सांगण्यच्या अटीवर ते अधिकारी म्हणाले. 

‘विराटला हवं तेव्हा विश्रांती देण्यात आली, त्यानं ज्यावेळी कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडलं तेव्हा BCCI नं त्याला शुभेच्छाही दिल्या होत्या, त्यामुळं मला खरंच ठाऊक नाही तो आता हे सगळं नेमकं कशाबद्दल आणि का बोलतोय?’, असं ते म्हणाले. 

बीसीसीआय आणि विराटमध्ये कोणताही वाद नसल्याचं म्हणत भारतीय क्रिकेटमध्ये त्यानं दिलेल्या योगदानचा आम्ही आदर करतो. तो तिन्ही प्रकारच्या क्रिकेटसाठी एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे, असं म्हणत त्यांनी विराटनं धावांचा डोंगर रचतच रहावा अशी इच्छा व्यक्त केली. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *