Headlines

Smartphone Tips: स्मार्टफोन चार्ज करताना या चुका टाळाच, बॅटरी चालेल वर्षानुवर्षे

[ad_1]

नवी दिल्ली: Charging: आता स्मार्टफोनशिवाय दैनंदिन आयुष्याची कल्पना करणे शक्यच नाही. फोन्स बहुतेक कामांसाठी वापरले जातात . पण, कालांतराने त्याची बॅटरी कमकुवत होऊ लागते. लिथियम आयन बॅटरी बहुतेक स्मार्टफोनमध्ये वापरल्या जातात. या बॅटरी साधारणपणे ३०० ते ५०० चार्ज किंवा डिस्चार्ज सायकलसह येतात. अनेकदा फोनची बॅटरी लाईफ कमी होऊ लागते आणि क्षमता कमी होऊ लागते. म्हणजेच पूर्ण चार्ज झाल्यानंतरही बॅटरी पूर्णपणे काम करत नाही. बॅटरी चार्ज करताना कोणत्या चुका करू नयेत याबद्दल आज आम्ही सांगणार आहो.

वाचा: हा Premium Smartphone तब्बल २८ हजारांच्या डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी, पाहा ऑफर डिटेल्स

बॅटरी चार्जिंग अलर्टची कधीही वाट पाहू नका:

अनेक यूजर्स फोनवरून अलर्ट मिळाल्यानंतरच बॅटरी चार्ज करतात. परंतु, नेहमी पॉवर संपण्याची वाट पाहू नका. फोनवरून अलर्ट मिळण्यापूर्वी फोन चार्जिंगवर ठेवा.

वाचा: मस्तच ! AirPods Lite आणण्याच्या तयारीत Apple, किंमत असेल सर्वात कमी

अधिकृत चार्जर वापरा:

मोबाईलसोबत आलेला अधिकृत चार्जरच वापरा. मूळ चार्जर उपलब्ध नसल्यास, एक सुसंगत चार्जर वापरला जाऊ शकतो. तुम्ही नॉन-कंपॅटिबल चार्जर दीर्घकाळ वापरल्यास फोनची बॅटरी खराब होऊ शकते.

सॉकेटमधून चार्जर काढा:

नवीन स्मार्टफोन बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यानंतर चार्जिंग थांबवतात. परंतु, याचा अर्थ असा नाही की चार्जर देखील काम करणे थांबवते. याशिवाय, चार्जिंग करताना मोबाईल फोन वापरू नका. यामुळे बॅटरी लवकर चार्ज होत नाही आणि डिव्हाइस सेलवर परिणाम होतो.

बॅटरी चार्ज होत असताना फोन वापरू नका:

मोबाईल चार्ज करताना त्याचा वापर करू नका. चार्जिंग करताना विशेषतः गेम खेळू नका किंवा व्हिडिओ पाहू नका. यामुळे बॅटरी पूर्ण क्षमतेने चार्ज होत नाही, ज्याचा परिणाम त्याच्या बॅटरी लाइफवरही दिसून येतो.

बॅटरीचे नुकसान असे होऊ शकते:

तापमानाचाही बॅटरीवर खूप परिणाम होतो. उच्च तापमान बॅटरीवर अधिक ताण आणते. त्यामुळे त्याची क्षमता लवकर कमी होते. अशात फोनची बॅटरी खूप गरम खोलीत चार्ज करू नका.

वाचा: IRCTC ला Tweet केल्यांनतर ‘ही’ चूक पडली महागात, हॅकर्सने गायब केले महिलेचे ६४ हजार

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *