Headlines

Shah Rukh Khan: “तो फायटर आहे, इंशाअल्लाह लवकरच…”, ऋषभ पंतसाठी किंग खानने मागितली दुआ!

[ad_1]

Shah Rukh Khan On Rishabh Pant: टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या कारचा 30 डिसेंबरला भीषण (Car Accident) अपघात झाला होता. आगीने खाक झालेल्या गाडीमधून ऋषभ थोडक्यात बचावला. या अपघातात त्याच्या डोक्याला, पाठील आणि गुडघ्याला दुखापत झाल्याचं समोर आलं होतं. दोन दिवसापूर्वी ऋषभ आयसीयूमधून (ICU) बाहेर आला. त्यानंतर आता त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. अशातच आता बॉलिवूडच्या किंग खानने (Shah Rukh Khan Tweet) ऋषभसाठी खास ट्विट केलंय. (shah rukh khan tweet for rishabh pant said inshallah he will be well soon he is a fighter and a very tough guy marathi sports news)

ऋषभ (Rishabh Pant) लवकर बरा व्हावा, यासाठी अनेकजण प्रार्थना करत असल्याचं दिसतंय. अनेक क्रिकेटर्स, अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी तसेच ऋषभच्या चाहते देखील ऋषभच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. अशातच शाहरूख खानने (Shah Rukh Khan On Rishabh Pant) एक ट्विट करत अनेकांचं मन जिंकलंय.

आणखी वाचा – Rishabh Pant health update: ऋषभ पंतच्या उपचाराबाबत मोठी बातमी, DDCA ने घेतला ‘हा’ निर्णय

दर्शन शाह नावाच्या ट्विटर युझरने शाहरूख खानला (Shah Rukh Khan Tweet) टॅग करत शाहरूखला पंतसाठी दुआ करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर शाहरूखने ट्विटला रिट्विट करत ऋषभसाठी प्रार्थना केली. इंशाअल्लाह. तो लवकरच बरा होईल. तो फायटर आणि खूप मजबूत आहे, असं शाहरूख ट्विट करत म्हणाला आहे.

पाहा ट्विट –

दरम्यान, ऋषभ पंतला पुढील उपचारासाठी मुंबईला (Mumbai) दाखल करण्यात येणार आहे. अपघातानंतर ऋषभ पंतवर डेहराडूनमधील खासगी रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू होते. ऋषभ पंतचा एमआरआय स्कॅनमध्ये (MRI Scan) कोणत्याही प्रकारची अडचण आढळून आली नसल्याने बीसीसीआयच्या (BCCI) डॉक्टरांनी सुटकेचा श्वास घेतलाय. त्यामुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये ऋषभ संघात सामील होणार नसल्याचं जवळपास निश्चित होताना दिसतंय.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *