Headlines

Shukra Asta 2022: 15 सप्टेंबरला शुक्र ग्रह अस्ताला जाणार! 12 राशींवर काय परिणाम होणार? जाणून घ्या

[ad_1]

Shukra Gochar 2022: सप्टेंबर महिना ग्रहांच्या गोचराच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे. शुक्र ग्रह परिवर्तनासोबत अस्ताला जाणार आहे. शुक्र ग्रह सुख, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव, विलास, प्रेम आणि प्रणय यांचा कारक ग्रह मानला जातो. पितृ पंधरवडा असल्याने ग्रहांचं गोचर आणि पितरांचा आशीर्वाद या दोन्ही गोष्टी जुळून आल्या आहेत. शुक्र ग्रह सुमारे 23 दिवसांत एका राशीतून दुसऱ्या राशीत बदलतो. 15 सप्टेंबर रोजी सिंह राशीत राहून शुक्र ग्रह अस्ताला जाईल. 24 सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करेल. त्यानंतर 02 डिसेंबर रोजी सकाळी 6.13 वाजता शुक्राचा उदय होईल. शुक्र सूर्याच्या जवळ आला की, प्रभावामुळे शुक्राची शक्ती काही दिवसांसाठी क्षीण होते. अशा स्थितीत शुक्राचा राशीत बदल किंवा अस्त होते, तेव्हा 12 राशींवर परिणाम होतो. 

मेष – या महिन्यात शुक्र ग्रहाचं अस्त आणि कन्या राशीतील गोचर तुम्हाला कौटुंबिक जबाबदाऱ्यांची जाणीव करून देईल. सुख आणि संपत्ती वाढेल. कुटुंबात सुख-शांती नांदेल.

वृषभ – तुमच्या जोडीदारासोबतचे नातेसंबंध चांगले राहतील. कुटुंबासोबत बाहेरगावी जाण्याच योग आहे. या राशीचे लोक आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतील.

मिथुन – या काळात तुमचा खर्च वाढू शकतो. लक्झरी वस्तूंच्या खरेदीमध्ये पैसे खर्च होतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. तुमचा पार्टनर तुमच्या भावना समजून घेईल.

कर्क – शुक्राचे संक्रमण आणि अस्त कर्क राशीच्या लोकांना संमिश्र परिणाम देईल. तुमचा अनावश्यक पैसा खर्च वाढू शकतो. वैवाहिक जीवनात आनंद पूर्वीप्रमाणेच राहील. लव्ह लाइफमध्ये गुंतलेले लोक आपल्या जोडीदारासाठी कुठेतरी बाहेर जाण्याची योजना बनवू शकतात.

सिंह –  या राशीचे लोक या काळात एकटं राहणं पसंत करतील. संपत्ती आणि सुखसोयींचा काही प्रमाणात अभाव असेल. प्रवास तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. रोमँटिक नातेसंबंधांनाही त्रास होऊ शकतो. प्रेम संबंधात अडचण वाढू शकते.

कन्या – नवीन लोकांचा सहवास मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या बळावर तुम्ही यशस्वी होऊ शकता. जोडीदारासोबत कुठेतरी जाण्याचा बेत आखू शकता. जे लोक एकटे आहेत त्यांना जोडीदार मिळू शकतो. 

तूळ – येणारा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुम्ही घेतलेल्या निर्णयांचे सर्वत्र कौतुक होईल. लोक तुमची स्तुती करतील. सुविधांची कमतरता भासणार नाही. नोकरी करणाऱ्यांना तसेच व्यावसायिकांना अनेक ठिकाणांहून उत्कृष्ट ऑफर मिळू शकतात. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील.

वृश्चिक – विलासी जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही. या काळात जोडीदाराची साथ मिळेल. सुख-संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र कोणताही निर्णय एकट्याने घेऊ नका, तुमच्या जोडीदाराचे मत घेऊनच पुढे जाणे योग्य ठरेल.

धनु – नात्यांमध्ये नवीन प्रकारचा अनुभव येईल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. या काळात धार्मिक कार्य होतील. तुम्हाला मनःशांती मिळेल.

मकर – या राशीच्या लोकांसाठी येणारा काळ खूप अनुकूल असेल. नातेसंबंध अधिक दृढ होतील. तुमच्या जोडीदाराचे नाते पूर्वीपेक्षा अधिक रोमँटिक होईल. पैशाच्या लाभाने तुमचे विलासी जीवन चांगले चालेल.

कुंभ – अविवाहित व्यक्तींना या काळात स्थळ येतील. आयुष्यात सर्व काही नवीन वाटेल, परंतु प्रेम प्रकरणात काही अडचणी येऊ शकतात. अशा स्थितीत प्रेम आणि करिअर यांच्यात योग्य ताळमेळ बसवा.

मीन – सुख-सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते. प्रेमळ जोडप्यांसाठी हा काळ खूप चांगला असेल. दोघांच्या आयुष्यातील संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होतील.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *