Headlines

‘मी आत्महत्या करायला गेले अन्…’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

[ad_1]

Ashwini Mahangade : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे चर्चेत आलेली मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडेनं प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे. अश्विनी महांगडे ही प्रेक्षकांचे तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतान दिसते. अश्विनीच्या अभिनय क्षेत्रातील प्रवास हा नाटकांपासूनच झाला होता. तिला पाहून ती किती आनंदी राहत असेल असे अनेकांना वाटते, पण तुम्हाला माहितीये का एक काळ असा होता जेव्हा तिला आत्महत्या करण्याचा विचार आला होता. त्याचा खुलासा तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला होता. 

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला आलेल्या या विचाराविषयी सांगितले की ‘आपण करिअर सुरू करताना काही वेळानंतर काहीच घडत नसेल तर आपल्याला असं वाटतं किती वर्ष प्रयत्न करायचे आणि अजून किती संकटांना सामोरं जायचं. मला जगायचंच नाहीये, असा विचार आपल्या मनात येतो. असा विचार येणाऱ्यांमध्ये मलाही असं वाटलं होतं. मी आत्महत्या करायला गेले होते. मीरारोडला शिवार गार्डन परिसरात असलेल्या एका तलावाजवळ जाऊन बसले होते. तेव्हा माझे होणारे पती आणि माझी बेस्ट फ्रेंड सतत फोन करत होते. पण, त्यांनी मला सांगितलं की फक्त एकदा नानांशी बोल. तेव्हा नाना मीरारोडला मावशीकडे आले होते. त्यामुळे ते तिथेच होते. तेव्हा मी खूप रडत होते. मी नानांना फोन केला आणि मला जगायचंच नाही असं सांगितलं. त्यांनी मला कुठे आहेस विचारलं. माझी मावशीची मुलगी त्यांना तिथे घेऊन आली.’

पुढे ती म्हणाली, ‘नाना आले आणि माझ्या शेजारी बसले. मी खूप रडत होते. त्यांनी मला शांत होऊ दिलं आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला. तेव्हा त्यांनी एकच गोष्ट सांगितली, हे बघ परमात्म्याने तुला काहीतरी बेस्ट करायला इथे पाठवलं आहे. जे तुझ्याकडून अद्याप घडलेलं नाही. मग, तुझी सुटका कशी होणार? ते बेस्ट करण्यासाठी थांब आणि मी थांबले. त्यानंतर मी पुन्हा माझ्या कामावर लक्ष केंद्रीत केलं. आज मी जे काही केलं आहे ते नानांमुळे आहे. मला तरुण पिढीला हेच सांगायचं आहे की संकट सगळ्यांना येतात. पण, त्या कठीण काळात आपण कोणाशी बोलतो, हे जास्त महत्त्वाचं आहे. आत्महत्या करणारा माणूस निघून जातो. पण, जे जगतात त्यांच्यासाठी प्रत्येक रात्र, त्यांचा वाढदिवस, त्यांचे क्षण जेव्हा जेव्हा आठवतात, तेव्हा ते खूप भयंकर अवस्थेतून जात असतात. तुम्हाला वाटतं की तुम्ही गरजेचे नाही आहात. पण, तुम्ही घरातल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचे असता.’ 

हेही वाचा : ‘आंटी’ म्हणत ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला अमृताचं सडेतोड उत्तर; म्हणाली, ‘अहो आजोबा…’

अश्विनीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय अश्विनी ही तिच्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *