Headlines

माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’ चित्रपटासोबत एकाच दिवशी धडकणार नाना पाटेकरांचा ‘हा’ मराठी चित्रपट

[ad_1]

Ole ale marathi movie motion poster: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे ‘झिम्मा 2’ या चित्रपटाची. यावेळी या चित्रपटातून दोन नव्या अभिनेत्रींचीही एन्ट्री झाली आहे. रिंक राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोन अभिनेत्री ‘झिम्मा 2’ मधून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. येत्या 24 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. सिद्धार्थ चांदेकरही आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

आता सिद्धार्थ चांदेकरचा अजून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचे नावं आहे ‘ओले आले’. या चित्रपटातून नाना पाटेकर, सायली संजीवही पाहायला मिळणार आहेत. सध्या या चित्रपटाचे पोस्टर हे सिद्धार्थनं आफल्या इन्टाग्राम अकांऊटवरून शेअर केले आहे. त्यामुळे याची सध्या जोरात चर्चा आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे आपल्या सर्वांचेच लाडके अभिनेते आहेत. 

आता ते आपल्या आणखी एका नव्या भुमिकेतून दिसणार आहे. हा चित्रपटाही हलकाफुलका, लाईट विनोदी चित्रपट असेल असं पोस्टरवरून दिसून येते आहे. सध्या या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. ज्यात नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव हे तिघंही वॉटर रायडिंग करताना दिसत आहेत. ज्यात ते प्रचंड आनंदी दिसत आहेत. यावेळी हा फोटो शेअर करताना त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, एक अशा प्रवासाची गोष्ट, ज्याने शिकवले जीवन जगण्याचे सूत्र! ‘ओले आले’, 5 जानेवारी 2024 पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!’ सध्या या चित्रपटातून मकंरद अनासपुरे, तन्वी आझमीही दिसणार आहेत. पुढील वर्षी 5 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याच दिवशी माधुरी दीक्षितचा निर्मिती असलेला ‘पंचक’ हा मराठी चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. 

हेही वाचा : धर्म- Not Applicable; जावेद अख्तर यांच्या नातींच्या जन्मदाखल्यात असं का नमूद केलंय? अखेर समोर आलं कारण

सध्या या चित्रपटाच्या मोशन पिक्चरवरून या चित्रपटाची जोरात चर्चा रंगलेली आहे. या पोस्टखाली कलाकारांनी आणि चाहत्यांनी नानाविध कमेंट्स केल्या आहेत. ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘आपला मानूस’, ‘नटसम्राट’ मधील कणखर भुमिकांनंतर नाना पाटेकरांच्या या मराठी चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. नाना पाटेकर हे नुकतेच विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द वॅक्सिन वॉर’ या हिंदी चित्रपटातून दिसले होते. या चित्रपटाचीही बरीच चर्चा होती. नाना पाटेकर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांतून, नाटकांतून आपल्या अभिनयाची मोहोर उमटवली आहे. ‘द वॅक्सिन वॉर’च्या निमित्तानं त्यांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीवरही भाष्य केले होते.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *