Headlines

Shivsena Mp Priyanka Chaturvedi commented on BJP after bjp candidate murji patel withdraws from andheri east byelection “डिपॉझिट जप्त होण्याच्या भीतीनेच भाजपाची माघार” प्रियांका चतुर्वेदींचे विधान, म्हणाल्या, “…ही तर फिक्स मॅच”

[ad_1]

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी हल्लाबोल केला आहे. “अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना ऐतिहासिक विजय मिळणार हे भाजपाला दिसत होतं. या निवडणुकीत डिपॉझिट जप्त होण्याची भाजपाला भीती होती”, असे चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. उमेदवारी मागे घेण्याबाबत राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रावर पत्रकाराने प्रश्न विचारताच ही फिक्स मॅच असल्याची प्रतिक्रिया प्रियांका चतुर्वेदी यांनी दिली आहे.

Andheri Election: भाजपाने माघार घेतल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “हे असे निर्णय…”

ऋतुजा लटकेंवर भ्रष्टाचाराचा आरोप करताना भाजपाची संवेदनशीलता कुठे होती? असा सवालही त्यांनी केला आहे. भाजपाला महाराष्ट्राच्या संस्कृतीची आता आठवण आली असेल, तर त्यांच्या भूमिकेचं स्वागत आहे. ‘देर आये दुरुस्त आये’ म्हणत प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपाला टोला लगावला आहे. पराभवाच्या नामुष्कीतून वाचण्यासाठीच भाजपानं माघार घेतल्याचं चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. उच्च न्यायालयातील विजयानंतर हा आमचा दुसरा विजय आहे. आगामी सर्व निवडणुकीत आम्ही मोठ्या बहुमतानं जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Andheri Election: भाजपाची माघार अन् राज ठाकरेंची कौतुकाची थाप; फडणवीसांना पुन्हा पत्र लिहित म्हणाले “आज तुम्ही…”

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. भाजपाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले आहेत. निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आवाहन करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा दाखविला आहे. यासाठी शिवसेना सदैव पवारांचे आभारी राहील, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *