Headlines

shivsena leader manisha kayande replied to narayan rane alligation spb 94

[ad_1]

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज (शुक्रवार) पत्रकारपरिषदेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी ”मला मारण्यासाठी शकील, छोटा राजन यांना उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती”, असा आरोप केला. त्याला शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा – “आदरणीय दादा, तुमच्या नेत्यांचा आदर…”, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर रोहित पवारांचं टीकास्र!

काय म्हणाल्या मनिषा कायंदे?

“नारायण राणे यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांची जी अवस्था झाली होती. ते बघून मी एवढंच म्हणेल, नारायण राणे कृपया लवकर बरे व्हा”, अशी प्रतिक्रिया मनिषा कायंदे यांनी दिली.

“राणेंना हिंदुत्त्वाबाबत बोलायचा अधिकार नाही”

नारायण राणे यांनी मुंबईला यावे, एखादी पत्रकार परिषद घ्यावी आणि उद्धव ठाकरेंवर आगपाखड करावी, यासाठीच भाजपाने त्यांना मंत्रीपद दिले आहे. कदाचित यानंतरच त्यांचा पगार होत असेल असे वाटते. नारायण राणेंचे आरोप नेहमीचेच आहेत. त्यांना हिंदुत्त्वाबाबत बोलायचा अधिकार नाही. कारण राणे आणि हिंदुत्त्व हे समीकरण जुळत नाही, अशी प्रत्युत्तर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी दिली आहे.

हेही वाचा – दसरा मेळाव्यावर पहिली प्रतिक्रिया देताना नारायण राणे संतापून म्हणाले, “राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर उद्धव ठाकरे…”

“…म्हणून त्यांची आगपाखड होते आहे”

शिवाजी पार्कवर झालेले उद्धव ठाकरेंचे भाषण सर्वांनीच ऐकले. त्यांनी यावेळी काही प्रश्न उपस्थित केले. सरसंघचालक मोहन भागवत मशिदीत का गेले? पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये का गेले? उद्धव ठाकरेंनी यांनी यावेळी बेरोजगारीवर, नोटबंदी असे अनेक मुद्दे उपस्थित केले. हे प्रश्न भाजपाच्या जिव्हारी लागले आहेत. याची उत्तरं त्यांच्याकडे नाही, त्यामुळे त्यांची आगपाखड होते आहे, असेही त्या म्हणाल्या.

काय म्हणाले होते नारायण राणे?

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. “मला मारण्यासाठी शकील, छोटा राजन यांना सुपारी दिली होती. काय झालं मारलं का कोणी? मी जिवंत आहे. मी तुम्हाला पुरून उरेन. आता तुम्ही एकनाथ शिंदेवर बोलताय, काय तर म्हणे पदं दिली. उपकार नाही केले. ही शिवसेना वाढवली कोणी, टिकवली कोणी, सत्तेपर्यंत आणली कोणी? केवळ शिवसैनिकांनीच”, असा आरोप नारायण यांनी केला होता.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *