Headlines

shivsena anant gite slams rebel mla eknath shinde group requests uddhav thackeray

[ad_1]

गेल्या महिन्याभरात शिवसेनेतील सर्वात मोठी बंडखोरी हाच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि शिंदे गट आणि भाजपाचं नवं सरकार राज्यात अस्तित्वात आलं. मात्र, अजूनही बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे सरकार अधांतरीच असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेला बंडखोर आमदारांचा गट आणि शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी सोमवारी रत्नागिरीत झालेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बोलताना बंडखोर आमदारांवर टीका केली आहे.

“सगळ्यासाठी जबाबदार बेईमान बंडखोरच”

यावेळी बंडखोरांवर टीका करताना ते जनतेच्या प्रश्नांसाठी नसून वैयक्तिक स्वार्थासाठी तिकडे गेल्याची टीका अनंत गीतेंनी केली. “जे सुरू आहे ते दुर्दैवं आहे. फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी ज्यांनी कुणी बंड केले, त्यात जनतेचं हित काय आहे? ते कोकणच्या विकासासाठी गेले आहेत का? जनतेच्या प्रश्नासाठी गेले आहेत का? त्यात नुकसानच होणार आहे. पण या सगळ्या नुकसानाला जबाबदार हे बेईमान बंडखोर असणार आहेत”, असं गीते म्हणाले.

“मी उद्धव ठाकरेंनाही सांगणार आहे की आता…”

“वैयक्तिक स्वार्थासाठी गेलेल्यांपैकी एकही आता परत येणार नाहीत. ते प्रयत्न उद्धव ठाकरेंनी करू नयेत. मी उद्धव ठाकरेंनाही सांगणार आहे. जे गेलेत, त्यांना मातीत गाडून टाकू आणि नव्याने शिवसेना उभी करू. बंडखोरांच्या गळ्यात पट्टा बांधला आहे आणि साखळी भाजपाच्या हातात आहे. त्यातला एकही परत येणार नाही”, असं देखील अनंत गीते यावेळी म्हणाले.

मुर्मू की सिन्हा? शिवसेना कुणाला पाठिंबा देणार? संभ्रम कायम, पण राऊतांनी मुर्मूंना पाठिंब्याचे दिले संकेत!

“मी मोदींना इशारा दिलाय, फक्त…”

दरम्यान, अशा प्रकारे शिवसेनेच्या गळ्याला नख लावण्याचं पाप करू नये असा इशारा आपण मोदींना दिल्याचं गीते म्हणाले. “मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा दिला आहे. इशारा हा शब्द मुद्दाम वापरतोय. फक्त राजकीय फायद्यासाठी, सत्तेसाठी शिवसेनेसारख्या कडवट हिंदुत्ववादी संघटनेच्या गळ्याला नख लावण्याचं पाप तुम्ही करू नका. हे सांगण्याचं धाडस माझ्याकडे आहे. तुम्हाला कळत नाहीये की तुम्ही कोणतं पाप करत आहात. शिवसेना ही केवळ महाराष्ट्राची गरज नसून अखंड हिंदू राष्ट्राची गरज आहे”, अशा शब्दांत गीतेंनी संताप व्यक्त केला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *