Headlines

shinde group abdul sattar on viral video about liquor beed collector

[ad_1]

गेल्या दोन दिवसांपासून राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राज्याचे कृषीमंत्री असूनही अतीवृष्टीनंतरच्या पीकपाहणी दौऱ्यादरम्यान अब्दुल सत्तार असं कसं वागू शकतात? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या वक्तव्यावरून विरोधकांनी सत्तार यांच्यावर परखड शब्दांत टीका करायला सुरुवात केली होती. त्यामुळे नेमकं तेव्हा काय घडलं होतं? आणि अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी पदावरील व्यक्तीला अशी विचारणा का केली होती? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर आता खुद्द अब्दुल सत्तार यांनीच मीडियाशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.

नेमकं काय झालं होतं?

अब्दुल सत्तार अतीवृष्टीनंतर शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी बीडचे जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा, अब्दुल सत्ता, अर्जुन खोतकर अशी काही नेतेमंडळी आणि इतर अधिकारी वर्ग चहा पिण्यासाठी बसलेले व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. चहा पित असताना त्यांचं झालेलं संभाषण या व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झालं आहे.

अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांना चहासाठी विचारणा केली असता “चहा कमी पितो” असं उत्तर त्यांनी दिलं. त्यावर अब्दुल सत्तार यांनी “दारू पिता का?” असा प्रश्न केला. हा प्रश्न ऐकून जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थित सर्वांमध्ये एकच हशा पिकला. मात्र, हा व्हिडीओ रेकॉर्ड होत असल्याचं लक्षात येताच लागलीच अब्दुल सत्तार कॅमेऱ्याकडे बघून हात हलवतानाही या व्हिडीओत दिसत आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

“छोटा पप्पू आत्ता जे बोलतोय, ते…”, आदित्य ठाकरेंना अब्दुल सत्तारांचा खोचक टोला!

“लोकांना काही कामच राहिलेलं नाही”

दरम्यान, या व्हिडीओवरून टीका सुरू झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “व्हायरल होणारा व्हिडीओ १५ दिवसांपूर्वीच्या बीडच्या दौऱ्यामधला आहे. त्यावेळी चहा पिण्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं होतं. पण आता लोकांना काही कामच राहिलेलं नाही. तेवढंच काम राहिलं आहे. बीडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आहेत. त्यांच्याशी चहाच्या गप्पा मी मारत होतो. तुम्ही जर आले, आणी मी तुम्हाला म्हटलं चहा घ्या. तुम्ही चहा घेत नाही, तर मग काय दुसरं काही घेता का? असं विचारलं. हेही बोलणं पाप असेल, तर मग त्याला नाईलाज आहे”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *