Headlines

शिंदे गटातील नाराज आमदार भाजपात जाणार? राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक विधान | NCP spoke person mahesh tapase on shinde group upset mla join to bjp 2024 assembly election rmm 97

[ad_1]

मागील काही दिवसांपासून शिंदे गटातील काही आमदार मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी शिंदे गटातील नाराज आमदारांबाबत सूचक विधान केलं आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटातील आमदार भाजपात सामील होतील, अशी शक्यता तपासे यांनी वर्तवली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत.

शिंदे गटातील नाराज आमदारांवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, “महाराष्ट्रातील शिंदे सरकारला लवकरच ग्रहण लागणार आहे. शिंदे गटातील आमदारांमध्ये सध्या नैराश्याचं वातावरण निर्माण झालं आहे. सत्तांतर घडवून आपल्याकडून फार मोठी चूक झाली, मंत्रीपदाची स्वप्न दाखवली गेली, पण ती पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे आपला डाव कुठेतरी फसला असल्याची कबुली शिंदे गटाचे नेते आपल्या मतदारसंघात देत आहेत.”

हेही वाचा- ‘रात्रीचे १ वाजले तरी फटाके वाजवतायत’, पोलिसांकडे तक्रार करणाऱ्या मुस्लिमांना मनेसेने सुनावलं, म्हणाले “तुमची भोंग्यावरील अजान…”

त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत शिंदे गटातील बहुतेक आमदार भारतीय जनता पार्टीच्या ‘कमळ’ निशाणीवर निवडणूक लढवतील की काय? अशी चर्चा त्या-त्या मतदारसंघात सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील सत्तांतराचा डाव फसला असून ज्या पद्धतीनं शिंदे सरकारने महाराष्ट्रात सत्ता काबीज केली, ते निश्चितच महाराष्ट्राला आवडलेलं नाही. त्यामुळे नाराज आमदार शिंदे गटाला सोडून भाजपात सामील होतील की काय? अशी चिंता एकनाथ शिंदे यांना पडली आहे, अशी प्रतिक्रिया तपासे यांनी दिली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *