Headlines

एकनाथ शिंदे म्हणाले तीन महिन्यांपूर्वीच फटाके फोडले, आता पेडणेकरांचा खोचक टोला, ‘पॅकेज’चा उल्लेख करत म्हणाल्या म्हणाल्या “तुम्ही जे…” | kishori pednekar criticizes eknath shidne on commenting on shiv sena party revolt

[ad_1]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली. या पक्षाचे सध्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाने दोन वेगवेगळी नावेदेखील दिली आहेत. दरम्यान, राज्यात सत्तांतर होऊन साधारण तीन महिने उलटले असले तरी अद्याप या सत्तांतर प्रक्रियेवर पडदा पडलेला नाही. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्ही तीन महिन्यांपूर्वीच फटाके फोडले आहेत. त्या फटाक्यांच्या आवाजाची तीवृता अजूनही आमचे हितचिंतक (ठाकरे गट) मोजत आहेत, असे म्हणाले आहेत. शिवसेनेमधील बंडखोरीच्या संदर्भाने ते बोलले आहेत. दरम्यान, शिंदे यांच्या याच विधानावर आता उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांनी खोचक टिप्पणी केली आहे. ‘टीव्ही ९ मराठी’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

हेही वाचा >>> आमदार राजू पाटील म्हणाले ‘मनं जुळली आहेत,’ आता मनसे-भाजपा-शिंदे गट युतीवर थेट एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

शिंदे याच टोलेबाजीवर उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. “मे महिन्यात तुम्ही जे फटाके, लवंगी बार फोडले; त्याचे पॅकेट म्हणजेच पॅकेज वेगळे आहे,” असे किशोरी पेडणेकर खोचकपणे म्हणाल्या आहेत. पैसे देऊन शिवसेनेतील आमदार फोडण्यात आले, असे त्यांना म्हणायचे होते.

हेही वाचा >>> नोव्हेंबरमध्ये शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्ग वाहतुकीस खुला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

एकनाथ शिंदे काय म्हणाले ?

माझं जे काही असते ते बेधडक असते. कालपासून दिवाळीचे फटाके फुटत आहेत. मात्र मागील तीन महिन्यांपूर्वीच आम्ही फटाके फोडले आहेत. त्या फटाक्यांचा आवाज आजही घुमतोय. आमचे जे हितचिंतक आहेत, ते फटाक्यांच्या आवाजाची तीवृता अजूनही मोजत आहेत. चांगलं आहे, असे एकनाथ शिंदे मिश्किलपणे म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *