Headlines

लग्नानंतरदेखील 7 वर्ष ‘या’ अभिनेत्रीसोबत होते शत्रुघ्न सिन्हा यांचे होते संबंध; पत्नीने अशा अवस्थेत पकडलं रंगेहाथ…

[ad_1]

मुंबई : अभिनेता आणि पॉलिटिशियन शत्रुघ्न सिन्हा यांच्या लग्नाला ३७ वर्षे झाली आहेत. शत्रून्घ सिन्हा यांनी 9 जुलै 1980 रोजी अभिनेत्री पूनम चंदिरामणीशी लग्न केलं. हा तो काळ होता जेव्हा शत्रुघ्न यांचं नाव रीना रायसोबत जोडलं जात होतं. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, रीनासोबत त्यांचं नातं 7 वर्षे टिकलं. विशेष म्हणजे, दुसऱ्या एका मुलाखतीत शत्रुघ्न यांची पत्नी पूनम यांनी खुलासा केला होता की, तिला तिचा नवरा आणि रीनाच्या अफेअरबद्दल सर्व काही माहित आहे. रीना यांना शत्रुघ्न यांच्या लग्नाचा धक्का बसला होता.

ज्यावेळी रीना राय यांचं बॉलिवूडमधील करिअर शिगेला पोहोचलं होतं, त्यावेळी शत्रुघ्न सिन्हासोबत तिचं अफेअर सुरू होतं. रीना काही कामानिमित्त लंडनला गेल्या होत्या, तेव्हा शत्रुघ्न यांनी पूनमसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. जेव्हा रीना यांना लग्नाची0000000000000 माहिती मिळाली तेव्हा त्या चिडल्या आणि लगेचच त्या लंडनवरुन परत आल्या आणि त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना जाब विचारला.

शत्रुघ्न आणि पूनम यांची लव्हस्टोरी
खरंतर काही काळापूर्वी पूनम कपिल शर्माच्या शो मध्ये आल्या तेव्हा त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबतची त्यांची लव्हस्टोरी सांगितली आणि सांगितलं की, आम्ही पटना ते मुंबई या ट्रेन प्रवास दरम्यान प्रथम भेटलो होतो. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न यांनी आपल्या आणि रीनाच्या नात्याची कबुली दिली होती.

तर अभिनेत्री रीना आणि शत्रुघ्न यांनी १२ हून अधिक सिनेमात एकत्र काम केलं आहे. त्यातले अधिकतर चित्रपट हे हिटच ठरले आहेत. पण १९८० मध्ये शत्रुघ्न यांनी पूनम यांच्यासोबत लग्न केलं. शत्रुघ्न यांच्या लग्नानंतरही रीना रॉयसोबत त्यांचे प्रेमसंबंध सुरुच होते.

पण हळूहळू रीना यांना वाटायला लागलं की शत्रुघ्न त्यांच्याशी लग्न करणार नाही. त्यामुळे दोघांमध्ये वादही होऊ लागले. दोघांमधल्या भांडणांमुळे निहलानी यांनी अनेकदा बिकट परिस्थितींचा सामना करावा लागायचा. पूनम यांनी सांगितलं की लग्नानंतर रीना आणि शत्रुघ्नच्या अफेअरच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या तेव्हा मला वाचून वाईट वाटयचं.

एकदा एका चित्रपटाच्या सेटवर जेव्हा पूनम शत्रुघ्नला भेटण्यासाठी गेल्या असता तिथल्या एका खोलीत त्यांनी शत्रुघ्न आणि रीना राय एकत्र एका पलंगावर पाहिलं हे बघून पूनम यांना चांगलाच धक्का बसला होता व त्या काहीच न बोलता तिथून घरी निघून आल्या.

जेव्हा मला या दोघांच्या प्रेम संबंधांची माहिती मिळाली तेव्हा मी त्यांच्या आयुष्यातून निघून जाणार होते. परंतु ज्या मुलीवर त्यांचा विश्वास नाही अशा मुलीशी लग्न करण्याची इच्छा शत्रूंना नव्हती. म्हणूनच लग्नानंतरही त्यांचं अफेअर चालू असून सुद्धाही मला कधी असुरक्षित वाटलं नाही. कारण मला माहिती होतं की शत्रुघ्न मला कधी सोडणार नाहीत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *