Headlines

शशांक केतकरने केली BMC च्या कारभाराची पोलखोल, म्हणाला ‘घाणेरडी मुंबई…’

[ad_1]

Shashank Ketkar Post : मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून शशांक केतकरला ओळखले जाते. ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला. शशांकने नाटक, मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा चारही माध्यमात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो कायमच सामाजिक परिस्थितीवर त्याचे मत स्पष्टपणे मांडताना दिसतो. आता नुकतंच त्याने मुंबईतील एका समस्येवर थेट भाष्य केले आहे. 

शशांक केतकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमीच विविध मुद्द्यांवर मत मांडताना दिसतो. नुकतंच शशांकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे त्याने मुंबईत रस्त्यालगत ठेवण्यात येणाऱ्या कचरापेट्यांची अवस्था दाखवली आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने मुंबई महापालिकेबद्दल संताप व्यक्त केला आहे.

शशांक केतकर काय म्हणाला?

या व्हिडीओत मुंबईत रस्त्यालगत ठेवण्यात येणाऱ्या कचरापेटी पाहायला मिळत आहे. या परिसरात सर्वत्र घाणीचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. तसेच या ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या दिसत आहेत. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये शशांकने त्याचे मत मांडत मुंबई महापालिकेला टॅग केले आहे.

“रस्ते, शहर, परिसर स्वच्छ ठेवणं ही आपली आणि महानगर पालिकेची जबाबदारी आहे. जिथे या ओळी लिहिल्या आहेत, तिथेच तुटलेल्या मोडलेल्या कचऱ्याच्या २ पेट्या ठेवल्या आहेत! आपण सगळे एकत्र मिळून बदल घडवू शकतो! पण कधी? हा बदल घडवण्याची आपली खरंच इच्छा आहे का?” असे शशांक केतकरने म्हटले आहे. यात त्याने ‘सत्य परिस्थिती’, ‘घाणरेडी’, ‘मुंबई’, ‘प्रदूषण’, ‘हे नाही चालणार’, ‘मुंबई महानगरपालिका’, ‘हेनाहीचालणार’, ‘ये नही चलेगा’ असे हॅशटॅग दिले आहेत. 

दरम्यान शशांक केतकरच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत. त्याच्या या पोस्टला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. यात एकाने “रोज रस्ते धुवायला महानगर पालिकेच्या पैशाची उधळपट्टी करतात त्यांना tag करा”, अशी कमेंट केली आहे. तर एकाने “मला वाटते की ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.आपण जर आपल्या घरात असा कचरा कुठेही टाकत नाही तर मग आपल्या देशात का टाकावा??हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा.म्हणजे ‘भारत माझा देश आहे’ हे वाक्य पुस्तका पुरत मर्यादित राहणार नाही”, अशी कमेंट एकाने केली आहे. तसेच एकाने “लोकांनाही आपल्या जबाबदारीची जाणीव असावी मुंबई mde प्रत्येक ठिकाणी अशीच अवस्था आहे”, असे म्हटले आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *