Headlines

शेन वॉर्नच्या Ball of the Century नंतर आता Steve Smith ने टाकलेला हा बॉल पहाच! Video व्हायरल

[ad_1]

Steve Smith Viral: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया (Australia vs South Africa, 3rd Test) यांच्यामध्ये खेळली गेलेली तिसरी टेस्ट (third test) ड्रॉ झाली. टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 475 रन्स करत डाव घोषित केला होता. तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 255 आणि दुसऱ्या डावात 2 विकेट गमावत 106 रन्स केले. हा टेस्ट सामना जरी ड्रॉ झाला असला तरीही स्टिव्ह स्मिथच्या एका व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली होती.

स्टिव्ह स्मिथ गोलंदाजी करत असताना त्याच्यासोबत एक घटना घडली. गोलंदाजी दरम्यान स्मिथने असा एक बॉल फेकला ज्यावर त्याला स्वतःला विश्वास बसेना. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मुख्य म्हणजे, हा व्हिडीओ चाहत्यांना देखील भरपूर आवडला आहे. 

स्टिव्ह स्मिथचा व्हिडीओ व्हायरल

दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात 23 व्या ओव्हरमध्ये स्मिथने फलंदाज सरेल इरवी (Sarel Erwee) ला एक बॉल टाकला. हा बॉल पीचवर टप्पा पडून स्मिथने विचार केल्यापेक्षा अधिक टर्न झाला. फलंदाज सरेल देखील या बॉलवर काहीसा गोंधळून गेला आणि या बॉलवर त्याला केवळ 1 रन घेणं शक्य झालं.

झालं असं की, स्मिथने जो बॉल टाकला होता तो शॉर्ट पीचवर टप्पा घेऊ टर्न घेतो आणि लेग साईडला वळतो. अशा बॉलवर सहसा फलंदाज स्वीप शॉट खेळतात. मात्र हा बॉल अधिकट टर्न झाल्याने स्मिथही कन्फ्यूज झाला आणि स्वतःच्या मनगटाकडे पाहू लागला.

स्मिथची रिएक्शन कॅमेरात कैद

स्टिव्ह स्मिथची ही रिएक्शन कॅमेरामध्ये कैद झाली आहे. यामध्ये बॉल टाकून गोंधळलेल्या स्मिथला पाहून लोकांनाही हा व्हिडीओ आवडला आहे. 

स्मिथच्या निवृत्तीवर होतायत चर्चा

गेल्या काही दिवसांपूर्वी कसोटीमध्ये निवृत्ती घेण्याचे संकेद दिले होते. अशातच पुन्हा एकदा निवृत्तीच्या चर्चांवर स्मिथने खुलासा केला. “मी ऑस्ट्रेलियाकडून अजून किती सामने खेळेल याबाबत आताच काही सांगू शकत नाही. येणाऱ्या मालिकांमध्ये मी खेळणार असून चांगल्यात चांगलं प्रदर्शन करण्याचा माझा प्रयत्न असल्याचं,” स्टीव्ह स्मिथने सांगितलं.  

स्टीव्ह स्मिथने  91 कसोटी सामन्यांमध्ये 60.6 च्या सरासरीने 8543 धावा केल्या आहेत. स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये स्मिथने आफ्रिकेविरूद्ध कारकीर्दितील 30 वं शतक पूर्ण केलं होतं. ऑस्ट्रेलियाकडून कसोटीमध्ये माजी कर्णधार रिकी पाँटिंगने सर्वाधिक 41 शतके केली आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *