Headlines

बिंधास्त उर्फी जावेदचं धक्कादायक वक्तव्य म्हणाली, ‘वडिलांनीचं केला २ वर्ष…’

[ad_1]

मुंबई : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद सध्या चर्चेत आहे. चित्रविचित्र कपड्यांमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या उर्फीविरोधात भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानंतर उर्फी व चित्रा वाघ यांच्यात वाद सुरू झाला आहे. मात्र यावेळी उर्फी तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. 

उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध आहे. उर्फी कधी-कधी तिच्या फॅशन सेन्सने लोकांना आश्चर्यचकित करते. उर्फीला तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी अनेकदा ट्रोलही केलं जातं. मात्र, ती याचा तिच्या आयुष्यावर परिणाम होऊ देत नाही. उर्फीची प्रतिमा आज बिंधास्त मुलीची असेल, पण एकेकाळी तिला खूप वेदना झाल्या आहेत. दिलेल्या मुलाखतीत उर्फीने स्वत: तिच्या आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले होते. 

वडिलांनी 2 वर्ष केलं टॉर्चर
उर्फी जावेदने या मुलाखतीत आपल्या वडिलांबद्दल अनेक आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या. ”वडिलांनी दोन वर्षांपासून सतत मानसिक आणि शारीरिक छळ केला”. असं उर्फीने या मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं.  जेव्हा ती 11वीत होती तेव्हा कोणीतरी तिचा फोटो अॅडल्ट साइटवर टाकला होता. त्यानंतर तिच्या स्वतःच्या कुटुंबीयांनीही तिला साथ दिली नाही असंही उर्फी यावेळी या मुलाखतीत म्हणाली.

आपलं बोलणं पुढे चालू ठेवत उर्फी पुढे म्हणाली की, “जेव्हा हे घडलं, तो माझ्यासाठी खूप कठीण काळ होता, कारण मला माझ्या कुटुंबाचा पाठिंबा नव्हता. त्यांनी माझ्यावर आरोप केले. मला पॉर्न स्टार देखील म्हटलं गेलं”.

आपलं बोलणं चालू ठेवत उर्फी पुढे म्हणाली, “माझ्या वडिलांनी 2 वर्षे माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला. डिप्रेशनमुळे मला माझं नावही आठवत नव्हतं. लोकं मला खूप घाणेरड्या शिव्या द्यायचे. मला काहीच बोलण्याचं स्वातंत्र्यही नव्हतं. 17 व्या वर्षी, मला सांगण्यात आलं की, मुलींना बोलण्याचा हक्क नसतो. पुरुष जे काही बोलतो तेच बरोबर असतं. मला आवाज आहे हेच मला माहित नव्हतं.

मी ऐकलाच नव्हता कधी माझा आवाज. जेव्हा मी माझं घर सोडलं तेव्हा मला सर्वाइव करायला बराच वेळ लागला. पण आता माझं व्यक्तिमत्व समोर आलं आहे आणि आता मी थांबणार नाही. यानंतर उर्फीने स्वतःला बोल्ड म्हणून परिभाषित केलं आणि म्हणाली, “उर्फी ही अशी मुलगी आहे, जी तिला जे वाटतं ते करते. जे माझ्या चेहऱ्यावर तेच माझ्या मनात आहे. मी पाठीमागे काही बोलत नाही. आणि मला त्याचा अभिमान आहे.”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *