Headlines

शमिता शेट्टीवर आली अशी वेळ, की सर्वांनी केलं दुर्लक्ष; Video Viral

[ad_1]

मुंबई : अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty) ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) मुळं घराघरात पोहोचली. सेलिब्रिटी कुटुंबातील शमिता बॉलिवूडमध्येही सक्रिय होती. ज्यानंतर रिअॅलिटी शोनं तिला प्रसिद्धी आणि हक्काचं माणूसही दिलं. 

शमिताचं हे हक्काचं माणूस म्हणजे प्रियकर राकेश बापट. राकेश आणि शमिताच्या प्रेमाचेच वारे सध्या सोशल मीडिया आणि कला जगतामध्ये वाहत आहेत.

आयुष्यात गोष्टी अगदी आनंददायी आणि सुरळीत सुरु असतानाच विस्कटलेले केस, निपचीत पडलेली शमिता असं तिचं रुप चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करुन जात आहे. 

तिला काय बरं झालं असावं, शमितासोबत सगळं ठिक आहे ना? असाच प्रश्न चाहते करताना दिसत आहेत. 

या प्रश्नांची उत्तरं तिनं शेअर केलेल्या व्हिडीओतून मिळत आहेत. 

शहनाज गिल (Shehnaaz Gill) हिचं सर्वात गाजलेलं, रील ‘सच अ बोरिंग डे’ वर शमितानं एक व्हिडीओ तयार केला आहे. 

जिथं तिच्यासोबत, आजुबाजूला असणारी सर्व मंडळी आपल्याच विश्वात रमलेली दिसत आहेत. तर शमिता मात्र आपल्याकडे कोणीही लक्ष देत नाही, या कारणामुळे वैतागलेली दिसत आहे. 

कोण बोलतच नाही, कोण बघतच नाही माझ्याकडे… कसला विचित्र आणि कंटाळवाणा दिवस आहे हा असंच ती कंटाळवाणा सूर आळवत म्हणाताना दिसतेय. 

शमिताचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरणंही कठीम होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ राकेश बापटने पाहिल्यावर तो कसा प्रतिक्रिया देईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *