Headlines

इंदिरा गांधी यांना झेंडूच्या फुलांची का होती चिड? फुलांचा तो किस्सा, क्वचितच कोणाला माहीत असेल

[ad_1]

मुंबई : आपल्याकडे झेंडुच्या किंवा गोंड्याला फार महत्व आहे. कोणतंही शुभकार्य करण्यासाठी आपल्याकडे ज्या फुलाला महत्व दिलं जातं, ते फक्त आणि फक्त झेंडूला. देवाला हार घालण्यापासून ते दरवाजाला तोरण बांधण्यासाठी देखील आपण झेंडूच्या फुलांचा वापर करतो. एवढंच काय तर एकादा पॉलिटिकल व्यक्तीला सन्मानीत करण्यासाठी देखील आपण त्याला झेंडूच्या फुलांचे हार घालतो. परंतु इंदिर गांधी यांनी मात्र कधीही झेंडूच्या फुलाला स्वीकारलं नाही. परंतु मरणानंतर मात्र त्यांना ते स्वीकाराव लागलंच.

तुम्हाला कदाचित भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधींबद्दल या गोष्टी माहित नसाव्यात. परंतु इंदिरा गांधी यांना झेंडूची फुलं अजिबात आवडत नव्हती. त्यामुळे त्या त्यांच्या सर्व सहकारी आणि कर्मचाऱ्यांना भेटायला येताना या फुलांना किंवा त्याचे हार घेऊन येऊ नका असे सांगायचे. 

ज्येष्ठ पत्रकार आणि ‘द मॅरीगोल्ड स्टोरी – इंदिरा गांधी अँड अदर्स’ या सुप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका कुमकुम चढ्ढा यांनी, त्यांच्या या पुस्तकाच्या मध्यमातून त्यांच्या या झेंडूचे फुल न आवडण्यामागची कहाणी सांगितली. 

कुमकुम म्हणाल्या की, “इंदिराजींचे संपूर्ण आयुष्यात त्यांच्या कर्मचार्‍यांचा सर्वात मोठा संघर्ष होता की, त्यांच्यापर्यंत झेंडूचे फूल पोहोचले नाही पाहिजे. या मागचे कारण होते की, त्यांना झेंडूची ऍलर्जी होती.”

लोकांचे इंदिरा गांधीवरती प्रेम होते, त्यामुळे लोक त्यांना भेटायला जाताना बऱ्याचदा झेंडूच्या फुलांचा हार घेऊन जायचे. परंतु त्यांना असे करण्यापासून इंदिरा गांधीचे सहकारी घेऊन जाण्यासाठी रोखायचे.

एका घटनेबाबात आठवत कुमकुम पुढे म्हणाल्या की, “जरी त्याच्याकडे कोणी झेंडूचे फूल नेण्यात यशस्वी झाले असले, तरी त्या कधीही लोकांना काही बोलायचे नाही. उलट जर असे घडले तर त्यांच्या सहकाऱ्यांची मात्र खैर नसायची.”

परंतु आयुष्यभर झेंडूपासून लांब राहिलेल्या इंदिरा गांधी यांना त्यांच्या शेवटच्या क्षणी मात्र झेंडूसोबतच राहावं लागलं.

मृत्यूनंतर त्यांचं पार्थिव तीन मूर्ती भवनात जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले तेव्हा त्यांना भेटायला आलेल्या लोकांनी त्यांच्या अंगावरती झेंडूच्या फुलांचेच हार ठेवले होते.

या घटनेबाबत सांगताना, कुमकुम सांगतात की हे पाहून त्यांना सारखं वाटत होतं की, उठून ती फुलं बाजुला काढायला हवीत. परंतु पण प्रसंग इतका औपचारिक होता की त्यांची इच्छा असुन देखील त्या ते करु शकल्या नाहीत.

या घटनेबद्दल सांगताना कुमकुम म्हणाल्या की, “मी धवनकडे पाहिलं, पण तो ही इतका तुटलेला होता की त्याच्या देखील हे लक्षात आलं नाही. पण इंदिरा गांधी हयात असत्या आणि दुसऱ्या कोणाच्या बाबतीत असं घडलं असतं, तर त्यांनी उठून झेंडूची फुले काढली असती. “



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *