Headlines

सेक्स लाईफ ते आवडती सेक्स पोझिशन; काय म्हणतायेत अभिनेत्री सेक्स लाईफवर, जाणून घ्या

[ad_1]

मुंबई : सहसा बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या सेक्स लाईफबद्दल बोलणं टाळतात. जसं  सामान्य माणूस आपलं  सेक्‍स लाइफ सीक्रेट ठेवतो. त्याचप्रमाणे बहुतेक स्टार्सना याबद्दल उघडपणे बोलणं आवडत नाही. जरी असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी सेक्स लाईफबद्दल अनेक खुलासे केले आहेत. हे खुलासेही हलकेफुलके नसून धक्कादायक आहेत. आज आम्ही तुम्हाला 5 महिला सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी त्यांच्या सेक्स लाईफबद्दल खुलेपणाने सांगितलं आहे.

सोनम कपूर (Sonam Kapoor)
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर सध्या पडद्यापासून दूर आहे. पती आनंद आहुजासोबत ती आयुष्यातील सुंदर क्षण घालवत आहे. जरी सोनमला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणं आवडत नाही. मात्र नेहा धुपियाच्या टॉक शोमध्ये तिने सांगितलं आहे की, तिने तिच्या सहकलाकारांसोबत कधीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत.

दीपिका पादुकोण (Deepika Padukone)
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने 2018 साली अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्न केलं. याआधी दीपिका अनेक सेलिब्रिटींसोबत रिलेशनशिपमध्ये होती, ज्यामध्ये रणबीर कपूर देखील एक होता. रणवीर सिंगसोबतच्या तिच्या सेक्स लाईफबद्दल बोलताना दीपिकाने सांगितलं होतं की, सेक्स हा शारीरिक असण्यापेक्षा भावनांशी जास्त संबंधित आहे.

ट्विकंल खन्ना (Twinkle Khanna)
सेक्सबद्दल बोलताना ट्विंकल खन्ना म्हणाली की, ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक टप्प्यावर आवश्यक असते. तिने सांगितलं की, तिला तिचा नवरा अक्षय कुमार आकर्षक वाटतो कारण तो काळानुसार खूप बदलला आहे.

मीरा राजपूत (Mira Rajput)
मीरा राजपूत आणि तिचा पती शाहिद कपूर अनेकदा सेक्स लाईफबद्दल बोलतात. ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये शाहिद कपूरने मीरासोबतच्या सेक्स लाईफबद्दल सांगितलं होतं की, त्याने कारमध्ये सेक्स केला होता.

आलिया भट्ट (Alia Bhatt)
सेक्स लाईफबाबतचा सर्वात महत्त्वाचा आणि धक्कादायक खुलासा आलिया भट्टने एका मुलाखतीदरम्यान केला आहे. तिने तिच्या आवडत्या सेक्स पोझिशनबद्दल सांगितलं होतं. यावेळी आलिया म्हणाली होती की, तिला सेक्सची मिशनरी पोझिशन आवडते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *