Headlines

प्रियंकाच्या पायाशी बसून दर अर्ध्यातासाने तिला प्रपोज करत होता आणि ती मात्र…

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड स्टार प्रियंका चोप्राचे (Priyanka Chopra) जगभरात लाखो चाहते आहेत. अनेकांना ती आवडते सुद्धा. पण 2018 मध्ये प्रियांकाने निक जोनससोबत (Nick Jonas) लग्न करुन अनेकांचं हृदय तोडलं. निकच्या आधी एका विदेशी कलाकारलाही प्रियांकाशी लग्न करायचं होतं. त्याचं नाव आहे जेरार्ड बटलर (Gerard Butler).

हॉलिवूड सुपरस्टार जेरार्ड बटलर हा रोमँटिक भूमिकांमुळे खूप प्रसिद्ध आहे. ‘पीएस आई लव यू’ आणि ‘डियर फ्रैंकी’ या चित्रपटातून त्याचे महिला फॉलोअर्स वाढले. महिलांच्या गराड्यात राहणारा हाच अभिनेता बॉलिवूड स्टार प्रियंकाच्या प्रेमात पडला होता. 

जेरार्ड बटलर हा 2009 ला भारतात आला होता. त्यावेळी प्रियांकाने बटलरसाठी पार्टीचं आयोजन केलं होतं. ही पार्टी वर्सोव्यातील बंगल्यात झाली होती. तेव्हा बटलर प्रियंकावर मोहित झाला आणि त्याने प्रियंकाला प्रपोज केलं होतं.

तेव्हा बटलरने जमिनीवर बसून प्रियंकाला प्रपोज करुन इंप्रेस करण्याचा प्रयत्न करत होता. पार्टीला उपस्थित असलेल्या एकाने दिलेल्या माहितीनुसार, बटलर दर अर्ध्या तासाने प्रियंकाला प्रपोज करत होता आणि प्रियंका त्याच्या वेडेपणावर हसत होती.  

बटलरने 2012 ला प्रियंकावर प्रेम व्यक्त केले होते. पण प्रियंकाकडून काहीच उत्तर मिळालं नव्हतं. ‘गेल्यावर्षी प्रियंका परदेशात गेली होती तेव्हा ती मालिबूला राहिली होती. पण तेव्हा मी शहराच्या बाहेर होतो आणि त्यामुळे प्रियंकाला भेटू शकलो नाही. मी तेव्हा लग्नही केलं नव्हतं आणि मी अजूनही प्रियंका चोप्राची वाट बघतोय’ असं बटलरनेच सांगितलं होतं. 

आतातर प्रियंका आणि बटलर हे दोघंही आपल्या वैयक्तिक आयुष्यात खूप पुढे गेलेत. प्रियंका चोप्राने 2018 मध्ये गायक निक जोनासशी लग्न केलं तर बटलर मॉर्गन ब्राउनला बऱ्याच काळापासून डेट करतोय. तर प्रियंकाने सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *