Headlines

selling firecrackers without license in mumbai prohobited Mumbai police released order Mumbai: विना परवाना फटाके विक्रीवर मुंबईत बंदी, मुंबई पोलिसांचे आदेश, नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

[ad_1]

देशभरात दिवाळीचा उत्साह असून फटाके खरेदीसाठी नागरिकांनी दुकानांवर गर्दी केली आहे. त्यातच मुंबई पोलिसांनी फटाके विक्री संदर्भात एक आदेश जारी केला आहे. विना परवाना फटाके विक्रीवर मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे. विना परवाना फटाके विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल, असे मुंबई पोलिसांनी या आदेशात म्हटले आहे.

विश्लेषण: पर्यावरणपूरक फटाके म्हणजे काय? त्यामुळे वायू प्रदूषण खरंच कमी होईल?

“लोकांची गैरसोय आणि धोका टाळण्यासाठी मुंबई महापालिका हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी कोणीही विना परवाना फटाके विक्री करताना आढळल्यास कारवाई करण्यात येईल”, अशी नोटीस पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी बजावली आहे. हा आदेश फटाके विक्रेत्यांवर १६ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान बंधनकारक असणार आहे.

अकोला : यंदा आतषबाजीला महागाईचे ‘फटाके ; किंमतीमध्ये १० ते ४० टक्क्यांपर्यंतची वाढ

दिवाळीच्या दरम्यान अनधिकृत विक्रेत्यांकडून बाजारात ठिकठिकाणी फटाक्यांची दुकानं लावण्यात येतात. परवाना नसताना करण्यात येणाऱ्या या फटक्यांच्या विक्रीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय या विक्रेत्यांकडे असलेल्या फटाक्यांच्या सुरक्षिततेबाबतही शाश्वती नसते. या अनुशंगाने मुंबई पोलिसांनी विना परवाना फटाके विक्रेत्यांवर बंदी घातली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *