Headlines

संजय राऊतांविरोधात अटक वॉरंट निघताच नारायण राणे आक्रमक, म्हणाले “ते काय…” | narayan rane criticizes sanjay raut after arrest warrant in medha somaiya defamation case

[ad_1]

किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) मानहानी प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी अटक वॉरंट जारी केले आहे. भारतीय दंडविधानातील कलम ४९९, ५०० अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या अटक वॉरंटनंतर आता भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊत हे काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. त्यांनी कोणतातरी गुन्हा केला असेल, असे राणे म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> Maharashtra Cabinet Expansion : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शाह यांची भेट, राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा?

“राऊतांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांना अटक होणार. संजय राऊत हे धुतल्या तांदळासारखे नाहीत. राऊत यांनी कोणतातरी गुन्हा केलेला आहे,” असे नारायण राणे म्हणाले. टीव्ही ९ मराठीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

हेही वाचा >>> एकनाथ शिंदेंच्या बंडाबद्दल विचारताच नारायण राणेंचे मिश्किल भाष्य, म्हणाले, ‘….मी ज्योतिषी’

न्यायालयात हजर न झाल्यामुळे राऊतांविरोधात अटक वॉरंट

मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी राऊत यांच्याविरोधात शुक्रवारी (९ जुलै) जामीनपात्र अटक वॉटंर जारी केले आहे. या अटक वॉरंटमध्ये राऊत यांना १८ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याआधी न्यायालयाने मेधा यांच्या तक्रारीची दखल घेत राऊत यांना समन्स बजावून सोमवारी (४ जुलै) हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र राऊत न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे जामीनपात्र वॉरंट बजावून राऊतांना १८ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा >>> अमरनाथ गुंफेनजीक ढगफुटी ; यात्रातळावरील १५ जणांचा मृत्यू, ४० जण बेपत्ता; मदत-बचाव कार्य सुरू

संजय राऊतांविरोधात कारवाई का होतेय?

दरम्यान, संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी संजय राऊत यांची माफी मागावी असे सोमय्या म्हणाले होते. त्यानंतर मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात राऊत यांच्याविरोधात १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला होता. मेधा यांनी दाखल केलेल्या तक्रारीत, राऊत यांनी केलेले आरोप निराधार आणि पूर्णपणे बदनामीकारक असल्याचे म्हटले होते. तसेच राऊत यांना नोटीस बजावून मानहानीच्या आरोपाखाली फौजदारी कारवाई सुरू करण्याची मागणी केली होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *