Headlines

“आव्हाडांनी त्या बाईला स्पर्श केला नसता तर…” विनयभंगप्रकरणी संजय गायकवाडांची खोचक प्रतिक्रिया | Sanjay gaikwad on molestation case filed against jitendra awhad rmm 97

[ad_1]

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेनं विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीजवळ झालेल्या गर्दी आव्हाडांनी आपला विनयभंग केला, असा आरोप संबंधित महिलेनं केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी एक ट्वीट करत आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला.

या सर्व घडामोडींनंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाडांनी त्या बाईला स्पर्श केला नसता, तर त्यांनी तक्रारच दाखल केली नसती, असं विधान गायकवाड यांनी केलं आहे. ते बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला आहे, या आव्हाडांच्या दाव्यावरही गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा- “…याला महाराष्ट्रात विनयभंग म्हणतात का?” आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सुप्रिया सुळेंचा संताप

या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना संजय गायकवाड म्हणाले, “जितेंद्र आव्हाडांवर दाखल झालेला गुन्हा खरा आहे की खोटा आहे? हे न्यायालयात सिद्ध होईल. आमच्यावरही त्या काळात अनेक गुन्हे दाखल झाले. तेव्हा आम्हीही असंच म्हणायचो. पण शेवटी न्यायालय यावर निर्णय देईल. त्यामुळे आव्हाडांनी आता कितीही ओरडलं तरी त्याला काहीही अर्थ नाही. कारण संबंधित महिलेची प्रतिक्रिया मी स्वत: ऐकली आहे. त्यामध्ये ती महिला म्हणाली की, आव्हाडांनी मला अस्पृश्य असल्यासारखं बाजुला केलं.”

हेही वाचा- विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेला आव्हाडांनी ‘बहीण’ म्हटलं? राष्ट्रवादीने थेट VIDEO च दाखवला

“शिवाय ती महिला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. त्यामुळे हे राजकारण नाही. आव्हाडांनी त्या बाईला स्पर्श केला नसता, त्यांना तशी वागणूक दिली नसती तर त्यांनी तक्रारच दाखल केली नसती. त्यामुळे आव्हाडांनी राजीनामा द्यावा की नाही? हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. तुम्हाला जनतेनं कामं करायला निवडून दिलं आहे. तुम्ही लोकांची कामं करायला पाहिजे. अशा गोष्टी राजकारणात चालतच असतात. आमच्यावरही अनेक गुन्हे दाखल झाले. पण आम्ही राजकारण सोडलं नाही” असा टोलाही संजय गायकवाड यांनी लगावला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *