Headlines

sandeep deshpande attacks uddhav thackeray over saamana advertise ssa 97

[ad_1]

तीन महिन्यांपूर्वी राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोलमडलं. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. तेव्हापासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचं ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’तून बंडखोर आमदार आणि एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. त्यात आता ‘सामना’तून महाराष्ट्र सरकारची जाहिरात करण्यात आली आहे. यावरून मनसेने शिवेसेनेवर टीका केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या मुख्य पानावर माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या फोटोसह एका कार्यक्रमाचे निमंत्रण झापण्यात आलं आहे. तसेच, या जाहिरातीमध्ये शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचंही नाव आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चां रंगल्या आहेत. तर, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी यावरून शिवेसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

हेही वाचा : एकाच दिवशी, एकाच वेळी अन् एकाच शहरात…., आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे येणार आमने-सामने

यावरून संदीप देशपांडे यांनी ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये म्हणातात, “खोके ‘सामना’च्या कार्यालयात पोहचले का?,” असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. तर, “सामनाचे खरे स्वरूप लोकांपुढे आलं आहे. आदित्य ठाकरे रोज सांगतात अनधिकृत सरकार आहे. मग, अनधिकृत सरकारची अधिकृत जाहिरात ‘सामना’त कशी झापली. पैसे मिळवण्यासाठी तुम्ही सर्व तत्व बाजूला सारतात. पैसा हेच तुमचं तत्व आहे,” अशी टीकाही संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर टीव्ही ९ मराठीशी बोलताना केली.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून खासदार अरविंद सावंत सातत्याने त्यांच्यावर टीका करत आहेत. मात्र, त्यांचे देखील नाव जाहिरातीमध्ये छापण्यात आलं आहे. तसेच, शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ‘सामना’त जाहिरात पाठवली होती. मात्र, तेव्ही ती नाकारण्यात आली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *