Headlines

Samantha Prabhu: मानसिक छळ, मारहाण आणि गर्भपात…? समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटाचं खळबळजनक कारण समोर!

[ad_1]

Samantha Ruth Prabhu : टॉलिवूडसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (#SamanthaRuthPrabhu) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनेता नागा चैतन्यला (Naga Chaitanya Divorce) घटस्फोट दिल्यानंतर समंथा नेहमीच तिच्या भावनांबद्दल सोशल  मीडियावर मोकळेपणाने व्यक्त होत असते. समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांना विभक्त होऊन एक वर्षाहून अधिक काळ उलटला आहे. त्यांची जोडी इंडस्ट्रीतील आवडत्या जोडींपैकी एक आहे. 

दोघे वेगळे का झाले? 

आज जरी ते वेगळे झाले असले तरी त्यांच्या चाहत्यांच्या मनात एक प्रश्न आहे की दोघे वेगळे का झाले? घटस्फोटादरम्यान अनेक तर्कवितर्क लावले जात होते. यामध्ये चैतन्यच्या चाहत्यांनी समंथावर अनेक आरोप केले. त्यांच्या लिंकअपच्या बातम्याही आल्या आहेत. याच दरम्यान समंथा आणि नागा चैतन्य वेगवेगळे का झाले याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.  समंथा आणि नागा चैतन्य ( Samantha Ruth Prabhu Naga Chaitanya) यांचे लग्न केवळ चार वर्षेचं टिकू शकले. यानंतर दोघांनी 2 ऑक्टोबर 2021 रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विभक्त होण्याची घोषणा केली. पण त्यांच्या घटस्फोटाचे कारण स्पष्ट झाले नव्हते. 

दीड वर्षानंतर धक्कादायक कारण उघड 

आता समंथा आणि नागा चैतन्यच्या ( Samantha Ruth Prabhu Naga Chaitanya) विभक्त होण्याच्या दीड वर्षानंतर त्याचे धक्कादायक कारण उघड झाले आहे. चित्रपट समीक्षक उमेर संधूने (Umair Sandhu Controversial Tweet) त्यांच्या घटस्फोटाचा खुलासा केला आहे. ट्विटनुसार, समंथाने नागा चैतन्यवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या ट्विटवर विश्वास ठेवला तर, समंथा रुथ प्रभूने अप्रत्यक्षपणे नागा चैतन्यपासून घटस्फोटाचा खुलासा केला आहे. तेलुगु फिल्मबीटनुसार, चित्रपट समीक्षक उमैर संधूने ट्विट केले आणि लिहिले, ‘सामंथाच्या म्हणण्यानुसार, नागा चैतन्यने तिच्यासोबत गैरवर्तन केले. तो खूप वाईट नवरा आहे. ‘मला मानसिक छळ सहन करावा लागला आहे. मारहाण केली, मी गरोदर होते पण माझा गर्भपात झाला. देवाचे आभार, मी घटस्फोट घेतला आणि त्याच्यापासून वेगळे झाले’. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर समंथा आणि नागा चैतन्य यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. 

चित्रपट समीक्षकांचे हे ट्विट समोर आल्यानंतर समंथा आणि नागा चैतन्य (Samantha Ruth Prabhu Naga Chaitanya) यांच्या घटस्फोटाचे कारण पुन्हा एकदा साऊथ इंडस्ट्रीत चर्चेत आले आहे. मात्र, समंथा आणि नागा चैतन्य सध्या त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहेत. समंथा तिच्या बॉलीवूड पदार्पणासाठी जोरदार तयारी करत असताना, चैतन्यने आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *