Headlines

सलमानच्या लेटेस्ट व्हिडीओने वाढवली चाहत्यांची चिंता, भाईजानच्या हेल्थवर आल्या अशा प्रतिक्रिया

[ad_1]

Salman Khan Dance Video : बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. सलमान खानचे लाखो चाहते आहेत. सलमाननं आपल्या कार्यक्रमात हजेरी लावावी असे त्याच्या चाहत्यांना नेहमी वाटते. अशाच एका कार्यक्रमातील सलमान खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मात्र, यावेळी सलमानला पाहुन त्याच्या चाहत्यांना आनंद झालेला नाही तर त्यांना त्याची चिंता वाटू लागली आहे. सलमान खानच्या आरोग्याला घेऊन त्यांना टेन्शन आलं आहे. हा व्हिडीओ एका वाढदिवसातील असल्याचं म्हटलं जातं आहे. 

सलमान खान डान्स व्हिडीओ

सलमानचा हा व्हिडीओ एका नेटकऱ्यानं एक्स अकाऊंट म्हणजे आधीच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत 57 वर्षाचा सलमान खान एका लोकप्रिय बिझनेसमॅनच्या नातवाच्या वाढदिवसाच्या पार्टीत डान्स करताना दिसत आहे. त्या व्हिडीओत सलमान डान्स करून दमल्याचे पाहायला मिळत आहे. सलमानला पाहून त्याच्या चाहत्यांना वाटते की तो आजारी आहे आणि खूप दमला आहे. पण तो त्याच्या कामामुळे आरोग्यावर दुर्लक्ष करत आहे. 

सलमानच्या चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

सलमान खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांची चिंता व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली की ‘भाईजान तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.’ दुसरा नेटकरी म्हणाला की ‘भाईजानच्या चेहऱ्याला काय झालं.’ तिसरा नेटकरी म्हणाला, सलमानला काही हेल्थ इशू आहेत, थोडे दिवस तो जीममध्ये जाऊन वर्कआऊट करू शकत नाही.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘खरं सांगू तर भाईजाणच्या आरोग्यावर खूप परिणाम झाला आहे. त्याच्या चेहऱ्याकडे आणि शरिराकडे तरी बघा.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘रात्री भाईजाननं दारू प्यायली असेल.’ 

हेही वाचा : VIDEO : पॅरिस फॅशन वीकमध्ये अमिताभ यांच्या नातीनं केलं डेब्यू

सलमानचे आगामी प्रोजेक्ट्स

सलमानच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो लवकरच ‘टायगर 3’ मध्ये दिसणार आहे. 10 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या निमित्तानं त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत कतरिना कैफ, इमरान हाश्मी दिसणार आहेत. तर शाहरुख खान हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याशिवाय सलमान सध्या ‘टाइगर वर्सेस पठान’ या चित्रपटाच्या तयारीत लागला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे विष्णु वर्धन करणार आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *