Headlines

सलमानच्या हातातील फिरोजा स्टोन ब्रेसलेट का आहे खास? हे रत्न ‘या’ 5 राशींचं भाग्य उजळेल

[ad_1]

Salman Khan Bracelet : बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खान खूप स्टायलिश अभिनेता म्हणून ओळखला जातो. सलमानची स्वतःची खास शैली असून त्याचे चाहते अनेकदा भाईजानची कॉपी करताना दिसून येतात. कधी सल्लूसारखी जीन्स, तर कधी त्याच्यासारखी हेअरस्टाइल. : सलमान खानच्या स्टाइलचा एक भाग म्हणजे त्याच्या हातातील निळ्या रत्नाचा ब्रेसलेट. भाईजान त्याच्या ब्रेसलेटशिवाय कधीच दिसला नाही. सलमानची कॉपी करण्यासाठी चाहते त्यांचा सारखा ब्रेसलेटही परिधान करतात. पण तुम्हाला माहित आहे का की सलमान हे फॅशनसाठी नाही तर एका खास कारणासाठी घालतो. भाईजानला जीवापेक्षाही प्रिय असलेल्या या ब्रेसलेटमधील रत्नाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (Why is Salman khan turquoise stone bracelet special This gem will brighten the fortune of these 5 zodiac signs important and benefits of wearing firoza)

ब्रेसलेट का आहे खास?

सलमान खानच्या या ब्रेसलेटमध्ये खास निळ्या रंगाचा एक दुर्मिळ असा दगड आहे. ज्याला रत्नशास्त्रात फिरोजा असं म्हटलं जातं. हे ब्रेसलेट भाईजानला त्याचं वडील सलीम खान यांनी दिलं आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान एका चाहत्याने अभिनेत्याला या ब्रेसलेटबद्दल विचारलं होतं. तेव्हा भाईजानने या ब्रेसलेटबद्दल सांगितलं की, ‘माझ्या वडिलांनी नेहमीच हे ब्रेसलेट घातलं आहे. मी लहानपणी अनेकदा त्याच्याशी खेळायचो. मोठेपणे मी ते एकदा घातलं ते माझ्या हातात मस्त दिसत होतं. जेव्हा मी काम करायला लागलो तेव्हा पप्पांनी मला त्यांच्यासारखं दुसरं ब्रेसलेट गिफ्ट केलं.”

सलमान पुढे म्हणाला की, “या दगडाला फिरोजा म्हणतात आणि इंग्रजीत त्याचं नाव टर्क्युज असं आहे. हे घालण्याचा फायदा देखील आहे, जेव्हा जेव्हा माझ्यावर कोणतीही अडचण येते तेव्हा हा खडा सर्व काही स्वतःवर घेतो आणि जेव्हाही तो फुटतो आणि तुटतो म्हणजे माझ्यावरील संकट नाहीसं होतं. हा माझ्या ब्रेसलेटमधील सातवा खडा आहे. 

फिरोजा रत्न परिधान करण्याची पद्धत आणि फायदे

गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी

फिरोजा रत्न हे गुरू ग्रहाचे उप-रत्न मानलं जातं. कुंडलीत सकारात्मक बृहस्पतिसाठी हे रत्न धारण करणं शुभ मानलं जातं. हे रत्न धारण केल्याने प्रत्येक कामात यशासोबतच आदर आणि एकाग्रता वाढते अशी मान्यता आहे. 

राहू-केतू साठी

नीलमणी रत्न धारण केल्याने राहू-केतू ग्रहांचं अशुभ प्रभाव बऱ्याच अंशी कमी होतात, असा विश्वास रत्नशास्त्र अभ्यासकांचा आहे. 

लग्नाला विलंब होत आहे

जर तुमच्या लग्नाला काही कारणास्तव उशीर होत असेल तर हे नीलमणी रत्न धारण केल्याने फायदा होतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतात. यासोबतच वैवाहिक जीवनात आनंदही कायम टिकून राहतो. 

तणावमुक्त राहण्यासाठी

जर तुम्हाला मानसिक शांती हवी असेल तर फिरोजा रत्न फायदेशीर असतो. यामुळे शारीरिक समस्याही दूर होण्यास मदत मिळते. 

नोकरी समस्या

जर बऱ्याच काळापासून एखाद्या समस्येमुळे नोकरीमध्ये अडचणी येत असतील आणि व्यवसायात सतत नुकसान होत असेल ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ त्याला हा रत्न परिधान करण्यास सांगतात. 

फिरोजा रत्न कोणी घालावे?

रत्नशास्त्रानुसार, धनु राशीच्या लोकांसाठी फिरोजा रत्न सर्वोत्तम मानला गेला आहे. त्याशिवाय मेष, कर्क, सिंह आणि वृश्चिक राशीचे लोक हा रत्न परिधान करु शकतात. 

फिरोजा रत्न घालण्याची पद्धत

फिरोजा रत्न सोने किंवा तांब्याच्या धातूमध्ये बनवून परिधान करण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्र देतात. हे रत्न धारण करण्यापूर्वी दुधात गंगाजल मिसळून त्यात अंगठी किंवा चेन किंवा ब्रेसलेट काही काळासाठी ठेवावं. त्यानंतर ते परिधान करावे. जेमोलॉजीनुसार गुरुवार आणि शुक्रवारी फिरोजा रत्न धारण करणे शुभ मानले जाते. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *