Headlines

सलमानसोबत स्क्रीन शेअर करणारा अभिनेता हेलिकॉप्टरमधून पडला आणि…

[ad_1]

मुंबई : (Bollywood Actor) बॉलिवूड अभिनेता इंदर कुमार यानं फार कमी वयातच जगाचा निरोप घेतला. सलमानसोबत इंदरनं बऱ्याच चित्रपटांमधून स्क्रीन शेअर केली. ‘मासूम’ या चित्रपटापासून अभिनय क्षेत्रा कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या इंदर कुमारनं या क्षेत्रात जीव ओतून काम केलं. पण, एका अपघातानं त्यांचं पुरतं आयुष्यच बदललं. 

चित्रपटांसाठी मेहनत घेणारा अभिनेता म्हणून (Inder Kumar) इंदरची ओळख होती. पण, ‘मसीहा’ चित्रपटातील एका दृश्यानंतर मात्र त्यानं कलाजगतातून काही काळ विश्रांती घेतली होती. त्याच्यावर इतकी वाईट वेळ ओढावली की कोणी आपल्या शत्रूसाठीही असा मनसुबा ठेवणार नाही. (Bollywood Actor Inder Kumar tragic life Accident that changed his career)

उपलब्ध माहितीनुसार दिग्दर्शक पार्थो घोष यांना या चित्रपटासाठी हेलिकॉप्टर सीन शूट करायचा होता. पण, या साहसी दृश्याचं चित्रीकरण करताना इंदर कुमार हेलिकॉप्टरमधून खाली पडला. हा अपघात इतका भीषण होता, की तीन वर्षांसाठी इंदरला पूर्ण आराम करण्याचा सल्ला देण्यात आला. यामुळं तो कलाविश्वापासून दुरावला. 

हा काळ इतका आव्हानात्मक होता, की खुद्द इंदरनंही तो पुन्हा आठवला नाही. या काळात डॉली बिंद्रानं मदत केली नसती, तर आपली अवस्था अतिशय वाईट असती असं खुद्द इंदरनंच एका मुलाखतीत सांगितलं.

इंदर कुमारला Bigg Boss या रिअॅलिटी शोची ऑफरही देण्यात आली होती. पण, सलमान (salman khan) त्याच्या प्रकृतीविषयी जाणून होता. ज्यामुळं त्यानंच इंदरला या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा सल्ला दिला. 2017 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं इंदरचं नइधन झालं. पण, त्याच्यातल्या सच्चेपणामुळं तो आजही प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरुपी स्थान मिळवून आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *