Headlines

फ्लिपकार्ट वेबसाईटवरून तलवारी मागवून अक्कलकोटमध्ये विक्री

[ad_1]

सोलापूर : फ्लिपकार्ट वेबसाईटवरून पंजाबमधून तलवारी मागवून अक्कलकोट तालुक्यात विक्री करणारा आणि तलवारी विकत घेणारे अशा १२ जणांना पोलिसांनी पकडले आहे. यात १२ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यात आगामी नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता अंमलात आल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैश शस्त्रे बाळगणा-या व्यक्तींवर कारवाईचे आदेश दिले आहेत. जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखेनेही अवैध शस्त्रे कोठे आणली जात आहेत का, या अनुषंगाने नजर ठेवली असता अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथे असा प्रकार चालत असल्याची माहिती समोर आली.

या गावातील एक व्यक्ती पंजाबमधून फ्लिपकार्ट वेबसाईटवरून तलवारी मागवत असल्याची माहिती प्राप्त झाली. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप व सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या पथकाने जेऊर येथे सापळा लावून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. बमलिंग पंचाक्षरी बमगोंडा (वय २५, रा. जेऊर) असे त्याचे नाव असून झाडाझडतीत त्याच्याकडे एक तलवार सापडली. त्याने फ्लिपकार्ट वेबसाईटच्या माध्यमातून पंजाबमधून तलवारी मागवून आसपासच्या काही गावांमध्ये तलवारी विकल्याची कबुली दिली. त्यानुसार उमेश सुरेश हांडे (वय २०, अक्कलकोट), गौतम अंबादास बनसोडे (वय १९), शब्बीर हसन नदाफ (रा. बंकलगी, ता, अक्कलकोट ), गजप्पा नागप्पा गजा (वय २३), रवी सुभाष चव्हाण (वय २३), राहुल सिध्दाराम हेळवे (वय २०), अनिल मल्लिकार्जुन हेळवे (वय २१ रा, करजगी, ता. अक्कलकोट ), नागप्पा सुभाष तळवार, नबीलाल रजाक मळ्ळी व मनपाक सिराज मिरगी (वय २२, रा. पानमंगरूळ, ता. अक्कलकोट) या तरूणांना ताब्यात घेतले. या सर्वांकडून प्रत्येकी एक तलवार हस्तगत करण्यात आली.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *