Headlines

भगवी बिकिनी…. दीपिकाच्या ऑऊटफिटवर भडकल्या हिंदू संघटना; पठाण चित्रपट बॅन करण्याची मागणी

[ad_1]

Boycott Pathaan trends: शाहरुख खानच्या (shahrukh khan) पठाण चित्रपटाचे पहिले गाणे “बेशरम रंग” सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या गाण्यात दीपिका पादुकोणने(deepika padukone) ऑरेंज अर्थात भगव्या रंगांची  बिकिनी घातली आहे. दीपिकाच्या ऑऊटफिटवर हिंदू संघटना भडकल्या आहेत. पठाण चित्रपट बॅन करण्याची मागणी केली जात आहे. तसेच सोशल मिडीयावर देखील बायकॉट पठाणचा ट्रेंड(Boycott Pathaan trends) पहायला मिळत आहे. 

‘पठाण’ सिनेमातील ‘बेशरम रंग’ गाण्यावरून शाहरुख खान आणि दीपिका पादूकोन वादात सापडले आहेत. या गाण्यात दीपिकाचा बोल्ड लूक दाखवण्यात आलाय. या गाण्यातील सिन्स आणि आउटफिट्सबाबत सोशल मिडियावर नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा सिनेमा बॉयकॉट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

भगव्या बिकीनीमुळे वाद

पठाण सिनेमात “बेशरम रंग” नावाच्या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकीनी घातली आहे. दीपीकाने मुद्दाम भगव्या रंगाचा ऑऊॉफिट घातल्याचा दावा हिंदी संघटनांकडून केला जात आहे. गाण्याचे बोल आणि दीपिकाच्या कपड्यांचे रंगात परफेक्ट मॅचिंग झाले आहे. बेशरम गाण्याप्रमाणे दीपिकाने कपडे देखील असेच बेशरम घातले असल्याची टीका होत आहे.

इतके सर्व रंग अस्तित्वात असताना या गाण्यासाठी फक्त भगवा रंग चं का निवडला असावा. त्याठिकाणी हिरवा रंग का निवडावा वाटला नाही? आणि जरी असला तरी “बेशरम रंग” या आशयाच्या गाण्यात आमच्या भगव्या रंगाला जाणीवपूर्वक टाकल आहे, आणि याशिवाय भगव्या रंगात अभिनेत्रीला अर्ध-नग्न देखील दाखवलं गेल असल्याची टीका होत आहे. 

काय आहे हिंदू संघटनांचा दावा

‘पठान’ चित्रपटात दीपिकाने  भगव्या रंगाचे कपडे अश्लील पद्धतीने परिधान केले आहेत. गाण्याचे बोल देखील बेशरम रंग असं आहेत. हा हा भगवा आणि सनातन धर्माचा अपमान आहे. ज्या भगव्याने संपूर्ण देशाला आणि जगाला दिशा देण्याचे काम केले त्याला निर्लज्ज रंग म्हटले जात आहे. सेन्सॉर बोर्डने हे गाण प्रदरर्शित करण्याला कशी काय परवानगी दिली असा सवाल हिंदू संघटनांनी उपस्थित केला आहे. या गाण्याचे बोल आणि दीपिकाचा ऑऊटफिट चेंज करावा अन्यथा सिनेमागृहांमध्ये चित्रपट तालू देणार नाही असा इशारा देखील हिंदू संघटनांनी दिला आहे.  ट्विटरवर देखील #BoycottPathan ट्रेंड पहायला मिळाला आहे. 

रवीनाने घातलेय भगवी साडी

यापूर्वी देखील बॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनेत्रींनी भगव्या रंगाचे आऊटफिट घातले आहे. यापूर्वी अभिनेत्री रवीना टंडनने टिप-टिप बरसा पानी या गाण्यामध्ये भगव्या रंगाची साडी घातली होती. भगव्या साडीतील या गाण्यात रवीनाने अक्षय कुमारसोबत अनेक इंटीमेंट आणि रोमँटिक सीन्स दिले होते. मात्र, तिच्या या भगव्या साडीवर अथवा रोमँटिक सीन्सवर कोणताही आक्षेप घेतला गेला नाही, मग आता दीपिकाच्या कपड्यांवरून वाद का घातला जातोय असा प्रश्न देखील शाहरुख आणि दीपिकाच्या चाहत्यांनी उपस्थित केला आहे.  

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *