Headlines

saamana editorial shivsena attacks bjp over rahul gandhi statement Savarkar get a stipend british ssa 97

[ad_1]

काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ कर्नाटकात पोहचली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या यात्रेला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचं दिसत आहे. त्यातच एकाठिकाणी संबोधित करताना राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ( आरएसएस ) आणि स्वांतत्र्यवीर सावरकरांना लक्ष केलं होते. यावरून राहुल गांधी आणि काँग्रेसवर भाजपाकडून टीका करण्यात येत होती. तसेच, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे याचा निषेध करणार आहेत की नाही?, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला होता. त्यावरून आता शिवसेनेने भाजपावर हल्ला केला आहे.

“राहुल गांधींनी काही वक्तव्य केले की, भाजपवाल्यांना सावरकरांचे स्मरण होते. तथाकथित माफी प्रकरणाचा रिकामा खुळखुळा वाजवत बसण्यापेक्षा सावरकरांचे हिंदुत्व, हिंदू राष्ट्राचा विचार, हिंदुत्वाबाबतचा वैज्ञानिक दृष्टिकोन, सैनिकीकरणावरील भर यावर देशातील प्रत्येक विद्यापीठात ‘अध्यासन’ असायला हवे. सावरकरांच्या विचारांचे वारसदार असल्याचे सांगून जे सत्तेवर आले, त्यांनी तरी या दीपस्तंभाचा काय सन्मान केला? फक्त राहुल गांधींना दोष देऊन काय फायदा? घरभेद्यांनीच सावरकरांचा सगळ्यात जास्त अपमान केला,” अशा शब्दांत शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपाचा समाचार घेतला आहे.

हेही वाचा – “नाव त्यांच्याकडे असलं तरी रक्त…”, बाळासाहेबांच्या नावावरून जयदीप ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

“भाजपवाल्यांना प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार…”

“काँग्रेसने वीर सावरकरांचा खुळखुळा केला आहे, तर भारतीय जनता पक्षाने स्वातंत्र्यवीरांचे खेळणं केलं आहे. काँग्रेस सावरकरांचा अपमान करीत असते व त्या अपमानाबद्दल भाजपवाले जाब वगैरे विचारत असतात. आताही महाराष्ट्राचे (उप) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीर सावरकर यांच्या राहुल गांधीकृत अपमानावर संताप व्यक्त केला. पण, फडणवीसांच्या संतप्त भावना खऱ्या आहेत काय? राहुल यांच्या या आरोपावरून देवेंद्र फडणवीस यांनी ‘उद्धव ठाकरे राहुल गांधींचा निषेध करतील काय?’ असा प्रश्न विचारला. मुळात हातात संपूर्ण सत्ता असूनही ज्यांनी सावरकरांचा योग्य सन्मान केलेला नाही, त्या भाजपवाल्यांना असा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का?,” असा सवालही शिवसेनेने देवेंद्र फडणवीसांना विचारला आहे.

हेही वाचा – पंतप्रधानांची नक्कल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “कायदा माझ्या बापाने…”

“भाजपच्या दृष्टीने सावरकर तोंडी लावायचा आणि चघळायचा विषय”

“भाजपाला तरी स्वातंत्र्य लढ्यातील वीर सावरकर किती कळले आहेत? ते कळले असते तर सावरकरांचा सन्मान व्हावा यासाठी त्यांनी नक्कीच पावले उचलली असती. सावरकरांचा मानसन्मान राहावा यासाठी दिल्लीतील मोदी सरकारने काय केले? गेल्या आठ वर्षांपासून वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करावे, अशी मागणी शिवसेना करीत आहे. सावरकरांच्या विचारांचे सरकार आले आहे, असे म्हणायचे, सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असे बोलायचे. पण ‘भारतरत्न’ देण्याची मागणी होताच तोंडे लपवायची हेसुद्धा तितकेच संतापजनक आहे. सावरकर हा भाजपच्या दृष्टीने तोंडी लावायचा आणि चघळायचा विषय झाला आहे,” असा हल्लाबोलही केंद्रातील मोदी सरकारवर शिवसेनेने केला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *