Headlines

Live सामना सुरु असतानाच टीमने बदलली प्लेइंग-XI, पण कशी? जाणून घ्या!

[ad_1]

मुंबई : भारताची देशांतर्गत टी20 लीग सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीला 11 ऑक्टोबरपासून सुरू झालीये. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सामन्याच्या मध्येच प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला होता. बीसीसीआयने देशांतर्गत टी-20 स्पर्धेत ‘इम्पॅक्ट प्लेयर’ हा नवा नियम लागू केला आहे. याअंतर्गत कोणताही टीम सामन्यादरम्यान प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो. 

सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीच्या या सिझनमध्ये हा नियम वापरणारी दिल्ली ही पहिली टीम ठरलीये. मणिपूरविरुद्धच्या गट-बी सामन्यात दिल्लीने याचा वापर आणि 22 वर्षीय हृतिक शोकीन पहिला प्रभावशाली खेळाडू ठरला. शोकीन आयपीएल 2022 मध्ये रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला होता.

खेळाडू म्हणून शौकीननेही दिल्लीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मणिपूरविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट्स गमावून 167 रन्स केले. दिल्लीकडून हितेन दलालने 27 बॉल्समध्ये 47 रन्स केले. पण, गोलंदाजीच्या कौरन हितेनच्या जागी, दिल्लीने मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळणारा ऑफस्पिनर शोकीनचा बीसीसीआयच्या नवीन नियम इम्पॅक्ट प्लेयर अंतर्गत प्लेइंग-इलेव्हनमध्ये समावेश केला.

त्याने सामन्यात दमदार गोलंदाजी केली आणि 3 ओव्हरमध्ये 13 रन्स देत 2 विकेट्स घेतले. यामुळे दिल्ली टीमने मणिपूरला 20 ओव्हर्समध्ये 96 रन्सवर रोखून सामना 71 रन्समे जिंकला.

देशांतर्गत क्रिकेटमधील वापराचा आढावा घेतल्यानंतर बीसीसीआय पुढील वर्षी आयपीएलमध्ये त्याची अंमलबजावणी करू शकतो. हे फुटबॉलमधील पर्यायी खेळाडूसारखं आहे.

काय आहे Impact Player चा नियम?

बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये Impact Player चा नियम लागू केला आहे. यामध्ये दोन्ही टीमच्या कर्णधाराला टॉसच्या वेळी त्यांच्या प्लेइंग इलेव्हन व्यतिरिक्त 4 पर्यायी खेळाडूंची नावे द्यावी लागतील. या चार खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेळाडूला सामन्यादरम्यान ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून कोणत्याही खेळाडूच्या जागी टीममध्ये समाविष्ट केलं जाऊ शकतं.

बदली करण्यात आलेला खेळाडू सामन्यातून बाहेर जाईल, तर उर्वरित सामना इम्पॅक्ट प्लेयरद्वारे खेळला जाईल. कर्णधार किंवा संघ व्यवस्थापनाने इम्पॅक्ट प्लेयर वापरण्यापूर्वी अंपायरर्सना सूचित करणं आवश्यक आहे. दोन्ही टीम डावाच्या 14 व्या ओव्हरच्या आधी Impact Player वापरण्यास सक्षम असतील.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *