Headlines

Rohit shetty मुळे अभिनेत्याला करावा लागला खतरनाक स्टंट… Ranveer Singh ही घाबरला अन् पुढे जे झालं ते…; Video व्हायरल

[ad_1]

khatron ke khiladi season 12: खतरों के खिलाडी (Khatron Ke Khiladi) हा लोकप्रिय शोचा बारावा सिझन (Season 12) सध्या सगळीकडेच चर्चेत आहे. या शोमधून नाना तऱ्हेचे महाभयंकर स्टंट्स केले जातात. आज टिव्हीवरील या सुपरहिट शोचा ग्रँड फिनाले (KKK 12 Grand Finale) आहे. 

आज सुपरहिट रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 12’ (KKK Season 12) चा ग्रँड फिनाले आहे. आज हा शो संपणार असून रविवारी रात्री त्याचा विजेताही घोषित (KKK 12 Winner) केला जाणार आहे. रोहित शेट्टीच्या रिअॅलिटी शोमध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Bollywood Actor Ranveer Singh), वरुण शर्मा (Pooja Hegde), पूजा हेगडे (Varun Sharma) आणि जॅकलीन फर्नांडिस (Jackline Fernandes) देखील सामील झाले आहेत. या शोमध्ये रणवीरने धमाकेदार एन्ट्री केली आहे. 

आणखी वाचा – Juhi Chawla ‘या’ स्टार कीड्सच्या प्रेमात, वाचा कोण आहेत ते?

रोहित शेट्टीच्या या शोमधून मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवही (Actor Siddharth Jadhav) सहभागी झाला आहे. रणवीर सिंग आणि सिद्धार्थ जाधव (Ranveer Singh & Siddharth Jadhav) हे या शोमध्ये स्पर्धकांसोबत खूप मस्ती करताना दिसत आहे. परंतु सध्या या शोचा एक धक्कादायक व्हिडीओसमोर आला आहे. नुकताच वाहिनीनं या शोचा एक प्रोमो इन्टाग्रामवर शेअर केला आहे तो पाहून कदाचित तुम्हाला धक्का बसेल. 

या शोमध्ये अभिनेता वरूण शर्मा (Varun Sharma) रोहित शेट्टीच्या जाळ्यात अडकला आहे. तो त्याला एक स्टंट करायला सांगतो ज्यासाठी रणवीर सिंग त्याला मदत करतो परंतु हा स्टंट पाहून मंचावर उपस्थित सगळेच शॉक्ड होतात. त्यात रणवीर सिंगही (Ranveer Singh Sacred) पुरता घाबरून जातो. 

आणखी वाचा – Amir Khan चा मराठी जावई आहे तरी कोण? photos होतायत व्हायरल

प्रकरण काय? 

‘खतरों के खिलाडी 12 लेटेस्ट प्रोमो’च्या लेटेस्ट प्रोमोमध्ये (KKK 12 Latest Promo) अभिनेता वरुण शर्मा शोचा होस्ट रोहित शेट्टीला विचारतो की या शोमधील स्टंट स्पर्धकांनी स्वतः केले आहेत की कोणत्यातरी स्टंटमनने?

या प्रश्नाच्या उत्तरात, सर्व खेळाडू ओरडून सांगतात की त्याला आता सर्व स्टंट स्वतः करावे लागतील. रोहित शेट्टी त्यांना वरूण शर्मा आणि सिद्धार्थ जाधवला स्टेजवर बोलावतो आणि स्टंट करायला देतो. या स्टंटमध्ये वरुणच्या जवळ एक भलामोठा हतोडा येतो आणि रणवीर सिंग त्याच्यासमोर तो हतोडा खाली फेकतो. तेव्हा हाच प्रोमो संपतो. 

आता हा स्टंट वरूण शर्मा खरंच यशस्वी करून दाखवणार का, की पुढे काय होणार हे येत्या ग्रॅन्ड फिनालेलाच समजेल. 

खतरों के खिलाडी 12 चा ग्रँड फिनाले शनिवारपासून सुरू झाला आहे. हा फिनाले दोन दिवस आहे. रविवारी संध्याकाळी उशिरापर्यंत शोचा विजेता घोषित केला जाईल. तुषार कालिया (Tushae Kalia), जन्नत जुबेर (Jannat Juber), फैसल शेख (Faisal Sheikh), मोहित मलिक (Mohit Malik), रुबिना दिलीक (Rubina Dilalk) आणि कनिका मान (Kanika Man) यांनी अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *