Headlines

Rishabh Pant Health Update: ऋषभ पंत वनडे वर्ल्डकपमधून बाहेर? ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

[ad_1]

Rishabh Pant Accident: टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या कारचा 30 डिसेंबरला भीषण (Car Accident) अपघात झाला. आगीने खाक झालेल्या गाडीमधून ऋषभ थोडक्यात बचावला आहे. या अपघातात त्याच्या डोक्याला, पाठील आणि गुडघ्याला दुखापत झाली. या भीषण अपघातानंतर त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र आता 2023 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप मध्ये संघात ऋषभ पंतची वापसी होणार की नाही यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे.

पायाची मोठी सर्जरी

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतच्या गुडघा आणि पायाच्या घोट्याचीची सर्जरी करण्यात येणार आहे. परिणामी पुढील 9 महिने त्याला क्रिकेटपासून दूर रहावे लागणार. 4 डिसेंबर 2023 रोजी ऋषभला एअरलिफ्ट करून देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमधून मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये (Kokilaben Hospital) दाखल करण्यात आले. पायाच्या सर्जरीसाठी पंतला लंडनला पाठवले जाऊ शकते. 

वाचा  : ऋषभ पंतच्या उपचाराबाबत मोठी बातमी, DDCA ने घेतला ‘हा’ निर्णय
 

लंडनला सर्जरीसाठी पाठवण्यात येईल

ऋषभ पंत जेव्ही बरा होईल तेव्हाच त्याला लंडनला सर्जरीसाठी पाठवण्यात येईल. त्याला ठिक होण्यास किती वेळ लागेल, हे सध्या सांगता येणार नाही. पण सर्जरीनंतर त्याला सूमारे 9 महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. सध्या आम्ही त्याच्या वापसीपेक्षा तो ठिक होण्यावर जास्त होण्यावर जास्त भर देत आहेत. तो शंभर टक्के ठिक झाल्यावर त्याच्या पुनरारगमनावर चर्चा होईल, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

नेमका अपघात कशामुळे झाला?

दिल्लीहून देहरादूनला (Dehradun) जाताना पंतला अपघात झाला होता. त्यामुळे त्याला जवळील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (DDCA director) संचालक श्याम शर्मा (Shyam Sharma) पंतला भेटण्यासाठी डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये (Max Hospital) पोहोचले, तेथं त्यांनी पंतशी चर्चा केली आणि यादरम्यान पंतने अपघाताबद्दल खुलासा केलाय.\

काय म्हणाला ऋषभ पंत?

श्याम शर्मा (Shyam Sharma) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पंतने सांगितले की त्याचा अपघात डुलकीमुळे झाला नाही तर खड्ड्यामुळे झाला. रात्रीची वेळ होती. त्यामुळे स्पष्ट दिसत नव्हतं. एक खड्डा होता, तो वाचवण्यासाठी गेल्यावर अपघात झाला, असं रिषभने (Rishabh revealed about accident) सांगितलं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *