Headlines

Shukrawar ke Upay : शुक्रवारच्या दिवशी करु नका ‘या’ 4 चुका, संपूर्ण कुटुंबावर येऊ शकतं संकट

[ad_1]

Rules for Maa Santoshi Vrat : हिंदू धर्मात देव आणि पूजेअर्चेला विशेष महत्त्व आहे. तुम्हाला माहिती आहे हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा एका देवाला समर्पित केला गेला आहे. तुम्हाला माहिती आहे सोमवार हा शंकर भगवान, मंगळवार हा गणपती…शास्त्रानुसार या देवतांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचा देवाच्या वारानुसार पूजा अर्चा केल्यास तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबात कायम देवांचा आशिर्वाद प्राप्त होतो. असं म्हणतात की, जर देवाच्या वाराच्या दिवशी तुम्ही काही चुक केल्यास तुमच्या कुटुंबावर संकट कोसळू शकतं. 

तुम्ही शुक्रवारी करता ‘या’ चुका?

आज शुक्रवार…शुक्रवार हा संतोषी मातेचा दिवस असतो. त्यामुळे जर तुम्हाला संतोषी मातेला प्रसन्न करायचं असेल तर 4 नियमांचं पालन करणे गरजेचं आहे. तर तुम्ही या 4 गोष्टी केल्या नाही तर तुमच्या कुटुंबावर आर्थिक संकट येऊ शकतो. 

‘या’ नियमांचं काटेकोरपणे पालन करा 

शुक्रवारच्या दिवशी संतोषी मातेला गूळ आणि हरभराचा प्रसाद दाखवा. हा प्रसाद नंतर कुटुंबातील सदस्यांना द्या. 

संतोषी मातेचं व्रत हे कठोर असून त्याचं पालन योग्य पद्धतीनं झालं पाहिजे. शिवाय नुसतं व्रत करुन नाही होत. या व्रतांचं योग्य पद्धतीने उद्यानपण करणेही तेवढचं महत्त्वाचं आहे. अन्यथा तुमची पूजा अर्चा ही अपूर्ण राहते. शिवाय संतोषी माता नाराज होते. त्यामुळे संतोषी मातेचं व्रत करताना मनोभावे आणि नियमाचे पालन करुन उद्यानपण नक्की करावे. (Know how to keep Santoshi Mata Vrat on Fridays riday santoshi mata vrat remedies)

शुक्रवारी जर घरात कोणी संतोषी मातेचं व्रत करत असेल. तर संपूर्ण कुटुंबातील सदस्यांनी शुक्रवारच्या दिवशी मांसाहार आणि मद्यपान करु नये. नाही तर संतोषी माता कुंटुंबावर नाराज होईल आणि तुमच्या कुटुंबावर मोठं संकट कोसळेल. 

संतोषी मातेचं व्रत करताना ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. शुक्रवारच्या दिवशी आंबट पदार्थ खाऊ नका. त्याशिवाय असे पदार्थ घरातही चूकही आणू नका. ही नियम कुटुंबातील इतर सदस्यांनी पाळणे महत्त्वाचा आहे. संतोषी मातेचं व्रत हे एका व्यक्तीपूर्ती मर्यादीत नाही. जर तुमच्या घरात कोणी हे व्रत करत असेल तर घरातील इतर सदस्यांनाही संतोषी मातेचे नियम पाळावे लागतं. अन्यथा या व्रताचं उपयोग नाही.   
 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *