Headlines

रिंकू राजगुरु नाही, हे आहे ‘आर्ची’चं खरं नाव; तुम्हाला माहित होतं?

[ad_1]

मुंबई : अभिनेत्री रिंकू राजगुरुचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सैराट सिनेमातून रिंकूने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. एखादी सर्वसामन्य मुलगी एका रात्रीत स्टार झाली आणि तिचं नशिबच पलटलं. सैराट सिनेमात तिने आर्चीची भूमिका साकारली. तिची ही भूमिका प्रेक्षकांनी इकती डोक्यावर घेतली की, सगळीकडे लोकं तिला पाहण्यासाठी गर्दी करु लागले. सोशल मीडियावर तिचे एका रात्रीत लाखो चाहते झाले. सैराटनंतर आर्ची आणि परशा अशीच सगळी चर्चा होवू लागली. जरी आज या अभिनेत्रीला रिंकू किंवा आर्ची या नावाने प्रेक्षक ओळखत असले तरिही ते तिचं खरं नाव नाहीये. आज आम्ही तुम्हाला अभिनेत्रीच्या खऱ्या नावाबद्दल सांगणार आहोत.

नुकतंच रिंकूने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन तिच्या चाहत्यासांठी ठेवलं होतं. यामध्ये तिला तिच्या चाहत्यांनी अनेक प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याविषयी बरेच प्रश्नही विचारले.तिच्या चाहत्यांनी यावेळी तिला बरेच प्रश्न विचारले. याच सेशनमध्ये तिला तिच्या एका चाहत्याने विचारलं की, तुझं निकनेम काय आहे? यावर अभिनेत्रीने उत्तर देत म्हटलं की, रिंकू. 

त्यावरुन हा प्रश्न अनेकांना पडला असेल की, जर अभिनेत्रीचं नाव निकनेम रिंकू आहे तर अभिनेत्रीचं खरं नाव काय आहे? तर पुढेच एकाने अभिनेत्रीला विचारलं आहे की, जर तुझं खरं नाव रिंकू नाही तर तुझं खरं नाव काय आहे. या प्रश्नावर तिने प्रेरणा असं उत्तर दिलं आहे.  अनेजण अभिनेत्रीचं खरं नाव सध्या गुगल वर शोधत असल्याचं समोर येत आहे. यानंतर आम्ही देखील गुगलवर रिंकू राजगुरु रिअल नेम असं सर्च केलं असता, तिचं खरं नाव रिंकू नाहीये हे समोर आलं आहे. याचबरोबर अनेक प्रश्न तिला या सत्रा दरम्यान विचारण्यात येत आहेत. ज्याची उत्तर अभिनेत्री तिच्या चाहत्यांना देत आहे.

काय आहे रिंकू राजगुरुचं खरं नाव?
समोर आलेल्या माहितीनुसार अभिनेत्रीचं खरं नाव रिंकू राजगुरु नाहीये तर अभिनेत्रीचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरु असं आहे. तर रिंकू हे तिचं टोपणं नाव आहे. हे ऐकून अनेकांना अश्चर्य वाटेल पण होय हेच अभिनेत्रीचं खरं नाव आहे. रिंकू ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. चाहत्यांचा संपर्कात राहण्यासाठी रिंकू सोशल मीडियावर नेहमीच तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. अवघ्या काही वेळातच रिंकूने शेअर केलेली प्रत्येक पोस्ट व्हायरल होते. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *